शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आपली संस्कृती नसलेले साहित्य कुचकामीच

By admin | Updated: November 2, 2014 00:39 IST

नितीन सावंत : तुकोबाराय साहित्य परिषदेचा मेळावा उत्साहात

सांगली : विज्ञानाचा आधार नसलेल्या कल्पनाविलासात रमणाऱ्या साहित्याने देशाची माती केली. ज्या साहित्यात खेड्यापाड्यातली संस्कृती, आपल्या वेदना, वास्तव नाही, ते साहित्य कुचकामी आहे, असे मत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश महासचिव नितीन सावंत यांनी सांगलीतील मेळाव्यात व्यक्त केले. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने साहित्यिकांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा आज शनिवारी येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की, आपली शिक्षणव्यवस्था पोपटपंची शिकविणारी आहे. शाळेत जे विज्ञान शिकवलं जातं, ते रुजवलं जात नाही. एका बाजूला भिंत निर्जिव असल्याचे सांगणारा अभ्यासक्रम दुसरीकडे ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे भिंत चालवत नेल्याचा पाठ शिकवितो. परस्परविरोधी शिक्षणपद्धतीने गोंधळ निर्माण केला आहे. देशातील विद्रोही व वास्तववादी साहित्यिक वगळता अन्य सर्व साहित्यिकांनी देशाची माती केली. अश्लील, अवास्तव साहित्याची निर्मिती त्यांनी केली. त्यामुळे सध्याच्या काळात वास्तववादी साहित्यनिर्मिती करण्याची गरज आहे. चित्रपटातील संस्कृतीही श्रीमंतांची आहे. बारा बलुतेदारांची, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याची, घरातील स्त्रीची, बालविश्वाची वास्तवाचे बोट धरून चालणारी संस्कृती साहित्य आणि चित्रपटात यायला हवी. शंभरपैकी ७५ साहित्यिक व्यसनाधीन आहेत. दारू पिल्याशिवाय त्यांची प्रतिभा बाहेर पडत नाही. जात्यावर गाणाऱ्या माईची प्रतिभा कोणत्याही व्यसनाशिवाय बाहेर पडते. त्यामुळे अशा व्यसनाधीन साहित्यिकांचीही ही पोकळ कारणे आहेत. संभाजी महाराज, जिजाऊ यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी मांडून तथाकथित साहित्यिकांनी निर्लज्जपणाचा कळस केला. परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. परिषदेचे विभागीय सचिव कपिल ढाके, राजेंद्र यादव, दत्तात्रय भोसले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. शुभांगी पाटील, प्रा. विठ्ठल मोहिते, आर. एस. पवार, प्रा. दास मोरे, डॉ. मीनाक्षी साळुंखे, संतोष जाधव, अपर्णा खांडेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)