शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहीन शुभमला साहित्याने दिली नवी दृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST

फोटो आहे... अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दृष्टी असूनही साहित्यसौंदर्याचा आस्वाद घेण्यापासून असंख्य लोक दूर असतात. अशा ...

फोटो आहे...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दृष्टी असूनही साहित्यसौंदर्याचा आस्वाद घेण्यापासून असंख्य लोक दूर असतात. अशा परिस्थितीत दृष्टिहीन असतानाही साहित्याच्या प्रांतात रममाण होऊन त्यातून मिळालेल्या दृष्टीने जगाकडे पाहण्याची व त्यातून समाजासाठी साहित्य निर्माण करण्याची धडपड एक तरुण करीत आहे.

तासगाव येथील शुभम वाघमारे या महाविद्यालयीन अंध मुलाने ब्रेल लिपीपासून ऑडिओ बुकापर्यंतच्या माध्यमांना कवेत घेत साहित्यविश्वाला आपलेसे केले. त्याने ‘अंध व्यक्तीची प्रेमकथा’ ही कादंबरी लिहिण्यास घेतली आहे. त्याने कथा, कविता, लेख अशा ६० हून अधिक साहित्यकृती निर्माण केल्या. पुस्तकरूपातून वाचकांपर्यंत पोहोचण्याचे त्याचे ध्येय आहे. सध्या पुण्यातील वाडिया महाविद्यालयात कला शाखेतील द्वितीय वर्षात तो शिकत आहे.

मिरजेच्या कै. सुशीलाबाई दानचंद घोडावत अंध निवासी शाळेत असताना त्यास शिक्षिका अनिता गायकवाड यांनी ब्रेल लिपीचे धडे देत मार्गदर्शन केले. शुभम कित्येक वेळ येथील ग्रंथालयात ब्रेलच्या पुस्तकात रममाण व्हायचा. त्यातून त्याची साहित्यदृष्टी तयार झाली. कोरोनाच्या काळात जेव्हा सारे ठप्प झाले तेव्हा शुभमने साहित्यलेखनाला सुरुवात केली. त्याने मोकळ्या वेळेचा उपयोग केला.

भविष्यात चांगली पुस्तके समाजाला अर्पण करून चांगले कार्य करण्याची त्याची इच्छा आहे. कला शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्याला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची आहे. केवळ स्वप्नांना मनाच्या गाभाऱ्यात बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची त्याची धडपड सुरू आहे. जन्मजात अंधत्वातून त्याची सुटका व्हावी म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले; पण उपयोग झाला नाही. डोळ्यांच्या नसा निकामी असल्याने त्यावर उपचार होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शारीरिकदृष्ट्या त्याला दृष्टी कधीही मिळणार नसली तरी शिक्षणाच्या दृष्टीने सारे जग पाहायचे, असा निश्चय त्याने केला आहे.

चौकटी

अनेक अडचणी

साहित्याचा अभ्यास करताना ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या उपलब्धतेची अडचण होती. त्यामुळे जवळपास शंभरावर पुस्तके वाचून झाल्यानंतर त्याने ऑडिओ बुकचे माध्यम निवडले. त्यातून बऱ्याच गोष्टी त्याने आत्मसात केल्या.

चौकट

कुटुंबियांकडून पाठबळ

शासकीय वसतीगृहात शिपाई म्हणून त्याचे वडिल नोकरी करतात. आई, वडिलांसह त्याला एक लहान भाऊ आहे. घरात तो एकमेव दिव्यांग असून त्याला सर्वजण पाठबळ देतात.