शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकींच्या खुनातील आरोपीला जन्मठेप

By admin | Updated: January 24, 2017 20:05 IST

अनैतिक संबंधातून दरीबडची (ता. जत) येथील जंगलात दीड वर्षाच्या चिमुरडीसह तिच्या आईचा खून करणाऱ्या

ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 24 - अनैतिक संबंधातून दरीबडची (ता. जत) येथील जंगलात दीड वर्षाच्या चिमुरडीसह तिच्या आईचा खून करणाऱ्या तिकोटा (जि. विजापूर) येथील चिदानंद हणमंत कोणूर (वय २८) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. पी. तावडे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले.अनिता मड्याप्पा कोणूर (२५) व तिची मुलगी वैष्णवी (३ वर्षे) यांचा चिदानंदने डोक्यात हातोडा घालून निर्घृण खून केला होता. ६ जून २०१४ रोजी ही घटना घडली होती. चिदानंद अनिताचा जवळचा नातेवाईक लागत असल्याने, त्यांची ओळख होती. यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले होते. अनिताला ऋतिक व वैष्णवी ही दोन मुले होती. चिदानंदशी संसार थाटण्याच्या उद्देशाने अनिता केवळ मुलीला घेऊन पळून गेली होती. पण पंधरा दिवसानंतर ती परत पतीच्या घरी आली होती. पतीने पंचासमक्ष तिच्याकडून कबूलनामा घेतला होता. पंधरा-वीस दिवस राहिल्यानंतर ती पुन्हहा वैष्णवीला घेऊन पळून गेली होती.चिदानंदसोबत ती गारगोटी (जि. कोल्हापूर ) येथे राहू लागली. चिदानंदला दारूचे व्यसन होते. त्या नशेत तो अनिताला मारहाण करू लागला. त्याच्या मारहाणीला ती कंटाळली होती. तिला मुलगा ऋतिकची आठवण येत होती. ह्यमाझ्या पतीकडे मला सोड, असा हट्ट तिने धरला होता. त्यामुळे तो अनितावर चिडून होता. अनिता पतीकडे गेली, तर ती परत येणार नाही, असे त्याला वाटत होते. त्यामुळे तिने तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले होते. अनिता व वैष्णवीला पतीकडे सोडण्याचा बहाणा करून त्याने दुचाकीवरून दरीबडची येथील पशुुवैद्यकीय दवाखान्यासमोरील जंगलात नेले. तेथे दोघींच्या डोक्यात हातोडा घालून त्यांचा खून केला होता. या घटनेनंतर तिसऱ्यादिवशी त्याला पकडण्यात यश आले होते.कडक शिक्षेची मागणीया खटल्यात नऊ साक्षीदार तपासले. अनिताची आई, वैद्यकीय अधिकारी, चिदानंदने ज्या दुकानातून दारू घेतली, त्या दुकानाचा मालक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने चिदानंदला शनिवारी दोषी ठरवून शिक्षेबाबतचा निकाल मंगळवारपर्यंत राखून ठेवला होता. मंगळवारी दुपारी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी त्याला कडक शिक्षा देण्याबाबत युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.