शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या खुनातील आरोपीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:30 IST

सांगली : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने परशुराम रोहिदास कट्टीमणी (वय २६) या मित्राचा कुºहाडीने हल्ला करुन निर्घृण खून ...

सांगली : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने परशुराम रोहिदास कट्टीमणी (वय २६) या मित्राचा कुºहाडीने हल्ला करुन निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी जितेंद्र ऊर्फ प्रदीप दिलीप तायडे (२५, रा. संजयनगर झोपडपट्टी) यास दोषी धरुन जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश भालचंद्र देबडवार यांनी गुरुवारी हा निकाल दिला.खटल्याची पार्श्वभूमी अशी, मृत कट्टीमणी व तायडे हे दोघे जीवलग मित्र होते. ते संजयनगर झोपडपट्टीत राहत होते. तायडे यास दारुचे व्यसन होते. त्याने कट्टीमणी यासही दारुचे व्यसन लावले होते. १३ आॅक्टोबर २०१३ रोजी रात्री साडेदहा वाजता कट्टीमणी हा त्याचा भाऊ भगवान व अन्य मित्रांसोबत मिरजेत मंगळवार पेठेतील चर्चजवळ दुर्गामाता देवीची विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेले होते. तिथे तायडे आला. त्याने कट्टीमणी यास बाजूला घेतले. ‘माझे एकाशी भांडण झाले आहे. आपण जरा दारु पिण्यासाठी जाऊया, नाही तर मला दारु पिण्यास पैसे दे’, असे तो म्हणाला. कट्टीमणी याने ‘तुझे तू बघ, माझ्याकडे पैसे नाहीत’, असे सांगितले. याचा तायडेला खूप राग आला. त्याने ‘मी तुला कित्येकवेळा माझ्या पैशाने दारु पाजली आहे. आज माझ्याकडे पैसे नाहीत. मला पैसे दिले नाहीस तर लक्षात ठेव’, असे म्हणून तो निघून गेला.दुर्गामाता देवीची मिरवणूक झाल्यानंतर कट्टीमणी हा घराजवळ आला. तेवढ्यात पाठीमागून तायडे कुºहाड घेऊन आला. त्याने बेसावध असलेल्या कट्टमणीच्या डोक्यात कुºहाडीने हल्ला केला. तो जोरात ओरडून रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर त्याने त्याच्या गळ्यावर हल्ला केला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून भाऊ भगवान धावत आला. त्याने तायडेला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तायडेने भगवानवरही हल्ला केला. परिसरातील लोक जमा झाल्यानंतर तायडे पळून गेला होता. कट्टमणी जागीच मरण पावला होता.याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी तपास केला होता. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अरविंद देश्मुख यांनी काम पाहिले. देशमुख यांनी सहा साक्षीदार तपासले. यामध्ये मृत कट्टीमणीचा भाऊ भगवान, वैद्यकीय अधिकारी राहुल कांबळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.जमावाला धमकी देत पसारकट्टीमणी याचा खून केल्यानंतर संजयनगर झोपडपट्टीतील रहिवासी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले होते. ते कट्टमणीला उपचारासाठी नेण्यास पुढे येताच तायडे याने जमावाला कुºहाडीच्या धाकाने धमकी दिली. ‘कट्टीमणीला कोणी मदत करायची नाही, कोण पुढे आले तर त्याला सोडणार नाही’, अशी धमकी देत तो पसार झाला होता. त्याला दुसऱ्यादिवशी अटक करण्यात यश आले होते.