शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

विटा येथील महाडिक हॉस्पिटलचा परवाना रद्द: बेकायदा गर्भपात प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 14:02 IST

सांगली येथील बेकायदा गर्भपात प्रकरणात सहभागाची शक्यता असल्याच्या कारणावरून रविवारी अटक करण्यात आलेल्या      डॉ. अविजित पोपटराव महाडिक याच्या विटा येथील महाडिक हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना

ठळक मुद्देसांगली  जिल्हा शल्यचिकित्सकांची कारवाईनगरपालिकेकडून रुग्णालयाला पत्र

विटा : सांगली येथील बेकायदा गर्भपात प्रकरणात सहभागाची शक्यता असल्याच्या कारणावरून रविवारी अटक करण्यात आलेल्या    डॉ. अविजित पोपटराव महाडिक याच्या विटा येथील महाडिक हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. बी. साळुंखे यांनी रद्द केला. शुक्रवारी डॉ. साळुंखे यांच्या आदेशानुसार विटा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे व विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी संयुक्तरित्या महाडिक हॉस्पिटलचा परवाना रद्द केल्याने रुग्णालय पूर्णपणे बंद ठेवण्याची सूचना लेखी पत्राद्वारे केली.

सांगली येथे बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉ. चौगुले दाम्पत्यास पोलिसांनी गजाआड केल्यानंतर विटा येथील डॉ. अविजित महाडिक याचे नाव तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्यासह पोलीस पथकाने शनिवारी रात्री उशिरा विटा येथील महाडिक हॉस्पिटलवर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांनी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली होती. रविवारी डॉ. अविजित महाडिक यास अटक केली.

या प्रकरणात डॉ. महाडिक यास अटक केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी विटा येथील महाडिक हॉस्पिटलला १९४९ च्या बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टच्या कलम ५ अन्वये देण्यात आलेला नोंदणी क्र. व्ही-४७९ हा वैद्यकीय परवाना रद्द केला. त्याबाबतचा आदेश ग्रामीण रूग्णालय व विटा नगरपरिषदेला पाठवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण रूग्णालय व नगरपरिषदेने शुक्रवारी दिलेल्या संयुक्त पत्राद्वारे डॉ. महाडिक यास रुग्णालयाचा मूळ परवाना वैद्यकीय अधीक्षकांकडे जमा करून, पुढील आदेश होईपर्यंत रुग्णालय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.

वैद्यकीय क्षेत्र हादरले...दरम्यान, गुरूवारी रात्री पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्यासह पोलीस व आरोग्य पथकाने डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या माऊली हॉस्पिटलवर छापा टाकून काही आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली होती. मात्र, डॉ. मेटकरी हे बाहेरगावी असल्याने पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे उपअधीक्षक वीरकर यांनी डॉ. मेटकरी यांना तातडीने हजर करण्याच्या सूचना नातेवाईकांना दिल्या आहेत. दरम्यान, बेकायदा गर्भपातप्रकरणी विट्यातील दोन रूग्णालयांवर कारवाई  झाल्याने वैद्यकीय क्षेत्र हादरले असून प्रचंड खळबळ उडाली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPolice Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी