शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ॲपेक्स रुग्णालयाला नियमानुसारच परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST

सांगली : ॲपेक्सला कोविड रुग्णालयाचा परवाना नियमानुसारच देण्यात आला आहे. २२ डाॅक्टरांसह ५६ कर्मचाऱ्यांचा स्टाफ असल्याची माहिती रुग्णालयाने दिली ...

सांगली : ॲपेक्सला कोविड रुग्णालयाचा परवाना नियमानुसारच देण्यात आला आहे. २२ डाॅक्टरांसह ५६ कर्मचाऱ्यांचा स्टाफ असल्याची माहिती रुग्णालयाने दिली होती, तसेच जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त परीक्षण समितीनेही या रुग्णालयाची वेळोवेळी तपासणी केली होती. महापालिकेने एकाच अर्जावर परवानगी दिलेली नाही. बॉम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच या रुग्णालयाला डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची मान्यता दिल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. उलट डाॅ.महेश जाधव याने नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेनेच त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्याचेही प्रशासनाने सांगितले.

ॲपेक्स रुग्णालयाप्रकरणी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डाॅ.सुनील आंबोळे यांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले. यात म्हटले आहे की, ऑगस्ट २०२० मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने, डाॅ.शरद सावंत यांच्या आदित्य हाॅस्पिटल अधिगृहीत करण्यात आले, पण सावंत यांनी रुग्णालय डाॅ. महेश जाधव याला चालविण्यास दिले होते. या हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन पाइपला गळती लागल्याने सांगली-मिरज रोडवरील ॲपेक्स रुग्णालयाला कोविडचा परवाना देण्यात आला. ॲपेक्सने तीन इंटेन्सिविस्ट, एक निवासी डाॅक्टर, २२ डॉक्टर्स व ३० पॅरामेडिकल स्टाफ असे ५६ कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती महापालिकेला दिली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३ एप्रिल रोजी डॉ.जाधव याने अर्ज केला. त्याला १४ एप्रिल रोजी मान्यता दिली. कोविड हॉस्पिटलमधील उपचार कार्यपद्धतीची तपासणी करण्यासाठी नियुक्त परीक्षण समितीनेही ॲपेक्सची पाहणी करून अहवाल जिल्हा परिषद कोविड नियंत्रण कक्षाला सादर केला आहे. १९, २७ एप्रिल व ३ मे रोजी समितीने पाहणी केली. रुग्णालयात उपचार कार्यपद्धतीचे पालन होत असून, चार व्हेंटिलेटर, दहा बायपॅप यंत्रे उपलब्ध असल्याचा अहवाल दिला आहे. महापालिकेने ॲपेक्सला एकाच अर्जावर परवानगी दिलेली नाही. बॉम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच परवाना दिला.

दरम्यान, या रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर, आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. ३ मे रोजी रुग्णालयाला परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर, ७ मे रोजी रुग्णालयाचा परवाना रद्द केला. रुग्णांची बिले लेखापरीक्षण पथकास उपलब्ध करून दिली नसल्याने जिल्हाधिकारी व आयुक्तांच्या आदेशाने १८ मे रोजी गुन्हा दाखल केला, असेही डाॅ.आंबोळे यांनी खुलाशात म्हटले आहे.

चौकट

रुग्णालयात अनेक त्रुटी

ॲपेक्सला २ मे रोजी भेट दिली असता, अनेक त्रुटी आढळून आल्या. यात जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावली गेली नव्हती. कोविड रुग्णांच्या उपचाराकरिता आवश्यक प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ आढळून आला नाही. आवश्यक व्हेंटिलेटर व इतर साधनसामुग्रीही पुरेशा नव्हत्या. तपासणी पथकासही हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला नाही. बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार दिलेल्या मुदतीत नोंदणी परवाना घेतलेला नाही. त्यामुळे डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल परवाना रद्द केल्याचे डाॅ.आंबोळे यांनी सांगितले.