इस्लामपूर : भारतीय ग्रंथालयाचे जनक म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा १२ ऑगस्ट हा जन्म दिन ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. रंगनाथन यांनी भारतीय ग्रंथालयासाठी मोलाचे योगदान दिले आहे, असे मत प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ग्रंथपाल दिनानिमित्त राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ग्रंथप्रदर्शन व ग्रंथ ओळख कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संचालिका डॉ. कुलकर्णी यांनी उद्घाटन केले. यावेळी डॉ. सचिन पाटील, डॉ. एल. एम. जुगुलकर व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रंथपाल प्रा. विश्वास हासे व ग्रंथालय कर्मचारी वर्ग यांनी संयोजन केले.