शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली ते उमदीपर्यंत भाग हिरवागार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त उर्वरित ६५ गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देण्याचा विचार सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त उर्वरित ६५ गावांना म्हैसाळ

योजनेतून पाणी देण्याचा विचार सुरू आहे. त्यातून चांदोलीच्या पायथ्यापासून उमदीपर्यंत सांगली जिल्ह्याचा भाग हिरवागार करू, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत

दिली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या

पहिल्या मजल्याच्या नूतनीकरणासह स्पोर्टस‌् क्लब व पोर्टलचे उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील होते. यावेळी बँकेचे

संचालक सी. बी. पाटील, प्रा. शिकंदर जमादार, किरण लाड, बी. के. पाटील,

प्रताप पाटील, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब

होनमोरे, कमल पाटील, श्रध्दा चरापले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी

जयवंत कडू-पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील

म्हणाले, यंदा महापुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्यात आम्ही यशस्वी झालो. वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित असणाऱ्या

गावांना त्याचा फायदा होत आहे. दुष्काळी भागातून बँकेची वसुली कमी होते, त्यामुळे तेथील क्षेत्र पाण्याखाली आल्यास बँकेची चांगली वसुली

होईल. म्हैसाळ योजनेतून जत

तालुक्याला पाणी देण्यात येत आहे. पाण्याची उपलब्धता झाल्यास उर्वरित ६५ गावांना पाणी देण्यात येईल. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव

पाटील यांचे संपूर्ण जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होईल.

दिलीपतात्या पाटील म्हणाले, बँकेत काम सुरू

केल्यानंतर अनेक अडचणी आल्या, काहींनी अडचणी निर्माण केल्या. मात्र जयंतराव पाटील यांचा अदृश्य हात कायम पाठीशी आहे. काही संचालकांनी बँकेच्या बैठकांना न येण्याचा, सह्या न

करण्याचा फंडा वापरला होता, असे सांगत त्याचाही खास शैलीत समाचार घेतला. स्वागत व प्रास्ताविक जयवंत कडू-पाटील

यांनी केले.

चौकट....

नावाला बट्टा लावला नाही

जिल्हा

बँकेत काम करताना तुमच्या नावाला बट्टा लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. याची खात्री करायची असेल, तर, तुम्ही

बँकेची गुप्त चौकशी करावी, अशी विनंती दिलीपतात्या पाटील

यांनी केली.

चौकट

बँक क्रमांक एकवर नेऊ

जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाच वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली असून, राज्यातील पहिल्या क्रमांकाची बँक बनविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.