इस्लामपूर : महिला बचत गटांप्रमाणे युवकांचे गट उभा करून, त्यांना उद्योग-व्यवसायास मदत, मार्गदर्शन व पतपुरवठा करण्याचा उपक्रम युवानेते प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील हे हाती घेत आहेत. या उपक्रमाचा आपल्या परिसरातील युवकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास नगरसेवक खंडेराव जाधव यांनी व्यक्त केला.
राजारामनगर येथे आविष्कार कल्चरल ग्रुप व राजारामनगर मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ आणि स्नेहमेळ्यात ते बोलत होते. यावेळी रास्त भाव असोसिएशनचे नूतन जिल्हा उपाध्यक्ष राजवर्धन लाड, पीएच.डी पदवी मिळविल्याबद्दल आरआयटीचे प्रा.डॉ.के.एस. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मोहन चव्हाण, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा.प्रदीप पाटील, माजी नगरसेवक आयुब हवालदार, आविष्कारचे अध्यक्ष सुनील चव्हाण उपस्थित होते.
प्रा.प्रदीप पाटील म्हणाले, कर्तृत्ववान आणि गुणवंत व्यक्तींचा सन्मान व्हायला हवा. यातूनच समाज अधिक प्रगत होत जाईल. त्यांच्या कविता वाचनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी मोहन चव्हाण, प्रा.डॉ.के.एस.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी सेलचा तालुका उपाध्यक्ष सुशांत कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा.शरद कुंभार यांनी स्वागत केले. युवक राष्ट्रवादीचे शहर संघटक सागर जाधव यांनी आभार मानले. प्रकाश जाधव, प्रकाश शेळके, विश्वनाथ पाटसुते, जमीर अत्तार, फिरोज लांडगे, सुनील नलवडे, विजय लाड, प्रल्हाद महाजन, फत्तेसिंग पाटील, तात्या पाटील, सतीश पाटील, संजय शिरोळे, किरण पाटील, मकरंद चव्हाण उपस्थित होते.
फोटो : १४ इस्लामपुर १
ओळी : राजारामनगर येथे राजवर्धन लाड, प्रा.डॉ.के.एस. पाटील यांचा सत्कार नगरसेवक खंडेराव जाधव, मोहन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा.प्रदीप पाटील, सुनील चव्हाण, प्रकाश शेळके, सागर जाधव उपस्थित होते.