शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’च्या पाण्याने आबांचे स्वप्न साकारू

By admin | Updated: April 30, 2016 00:50 IST

सुमनताई पाटील : बेलवन ओढ्यात पाण्याचे पूजन; ग्रामस्थांची सभा

ढालगाव : ‘टेंभू’च्या लाभक्षेत्रातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणून आबांचे स्पप्न पूर्ण करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आ. सुमनताई पाटील यांनी केले. नागज (कवठेमहांकाळ) येथील बेलवन ओढ्यात टेंभू योजनेच्या पाण्याचे विधिवत पूजन केल्यानंतर सिध्दनाथ मंदिराजवळ झालेल्या सभेत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे होते. सगरे म्हणाले की, टेंभू योजनेत ढालगावसह परिसरातील आठ गावांचा समावेश आर. आर. (आबा) पाटील यांनीच केला, ही वस्तुस्थिती आहे. यापुढील काळात उर्वरित गावांना जलदगतीने पाणी देण्यासाठी आमदार पाटील प्रयत्न करतील. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, जालिंदर देसाई, बाजार समितीचे माजी उपसभापती कोंडाजी पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक अविनाश यमगर आदींनी भाषणात, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांचे नाव व घेता टीकेची झोड उठविली. कोंडाजी पाटील म्हणाले की, ज्या झाडाच्या सावलीखाली वाढला, त्याच्यावरच घाव घालता! टेंभूचे श्रेय हे शिवाजीराव शेंडगे (बापू), विठ्ठलदाजी पाटील, अजितराव घोरपडे व आर. आर. पाटील आबांचे आहे. मग आपण नारळ कशासाठी फोडता? अविनाश अमगर म्हणाले की, शेंडगे बापू, घोरपडे सरकार, आबा आणि आता संजयकाका अशी तुमची निष्ठा आहे. आम्ही सांगली, चोरोचीत राहिलो, तरी निष्ठा बदलली नाही. तुम्ही तुमची निष्ठा तपासा. यावेळी जिल्हा परिषद सभापती भाऊसाहेब पाटील, पं. स. उपसभापती जगन्नाथ कोळेकर, दत्ताजी पाटील, चोरोचीचे राजाराम पाटील, घाटनांद्रेहून सरपंच अमर शिंदे, कदमवाडी सरपंच सुभाष खांडेकर, माजी सभापती सुरेखा कोळेकर, किसन टोणे, जांभुळवाडीचे सरपंच संजय दार्इंगडे, चुडेखिंडीचे विठ्ठल पाटील, घोरपडीचे अशोक मलमे, पांडुरंग यमगर, गणेश पाटील, ढालगावचे कुमार पाटील, पोपट शेटे, संजय पाटील, निमजचे विश्वनाथ रुपनर, नागजचे पोपट शिंदे, सुधीर पाटील यांच्यासह शिंदेवाडीचे बंडू पाटील, धर्मराज रुपनर उपस्थित होते. प्रास्ताविक संजय सूर्यवंशी यांनी केले. (वार्ताहर)