शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

गोरगरिबांच्या पोरांनाही खेळाचे धडे

By admin | Updated: April 13, 2015 00:03 IST

तज्ज्ञांचे मार्गदर्शन : क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे मिळणार प्रशिक्षण

आदित्य घोरपडे - हरिपूर लाल मातीतले अस्सल हिरे गोळा करण्यासाठी सांगलीच्या क्रीडाधिकारी कार्यालयाने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. गोरगरिबांच्या पोरांना खेळाचे धडे देऊन त्यांच्यातील स्पोर्टस् टॅलेंटची कदर करण्यासाठी या कार्यालयाने एक पाऊल पुढे टाकले आहे. खासगी उन्हाळी क्रीडा शिबिरांची भरमसाठ फी मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे इच्छा असूनही मुलांना अशा शिबिरात घालता येत नाही. परिस्थितीअभावी जिल्ह्यातील हे ‘स्पोर्टस् टॅलेंट’ वाया जाऊ नये यासाठी सांगलीचे क्रीडाधिकारी कार्यालय सरसावले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सर्वप्रथम या शासकीय क्रीडा शिबिराची संकल्पना मांडली. कार्यालयातील कर्मचारी व प्रशिक्षकांच्या साथीने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवत अंमलबजावणीही झाली. क्रीडाधिकारी कार्यालय व शासकीय जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २८ एप्रिलदरम्यान जिल्हा क्रीडा संकुलामध्ये हे शिबिर होणार आहे. शिबिर अनिवासी असून त्याची वेळ सकाळी साडेसहा ते साडेअकरा आणि दुपारी साडेतीन ते सहा अशी आहे. सहभागी मुलांना टी-शर्ट, शॉर्ट, कॅप, सकाळचा नाष्टा, दूध, सायंकाळी सरबत, फळे व सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. शिबिरात राष्ट्रीय प्रशिक्षक उमेश बडवे (हॉकी), महेश पाटील (मैदानी), मधुरा सिंहासने (वेटलिफ्टिंग), अभय चव्हाण (बास्केटबॉल), एस. एल. पाटील (मैदानी), भीमराव भांदिगरे (खो-खो), संदीप पाटील (जलतरण), वैशाली शिंदे (क्रिकेट), मंदार मेहंदळे (तलवारबाजी) आदी तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. एरव्ही ओस पडलेले हे संकुल आता भर उन्हातही खेळाडूंच्या गर्दीने ‘एव्हरग्रीन’ होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात क्रीडाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेले हे पहिलेच शिबिर आहे. क्रीडापंढरी सांगलीच्या भूमीत होणाऱ्या या प्रयोगातून महाराष्ट्राला दर्जेदार खेळाडू मिळतील, असे मत क्रीडा प्रशिक्षकांतून व्यक्त होत आहे. समाजातील सर्व स्तरातील मुलांना खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण घेता यावे यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. परिस्थितीअभावी खेळापासून वंचित राहिलेल्यांना हे चांगले व्यासपीठ आहे. यातून निश्चितपणे दर्जेदार खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास आहे.- युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारीया खेळांचे मिळणार धडे...अ‍ॅथलेटिक्स तलवारबाजीवेटलिफ्टिंग बास्केटबॉलव्हॉलिबॉल जलतरण खो-खोक्रिकेट कबड्डी हॉकी