शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या एका झडपेत त्यांचे काळीज मातीआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:30 IST

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : नियतीचा खेळच वेगळा, बिबट्या आला आणि होत्याचे नव्हते करून गेला आणि एका ...

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: नियतीचा खेळच वेगळा, बिबट्या आला आणि होत्याचे नव्हते करून गेला आणि एका कुटुंबाला व्यवसाय सोडून गावाकडे परत जावे लागले. गेले वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला काळजाचा तुकडा क्षणार्धात डोळ्यांसमोर मातीआड गेला. चिमुकल्याच्या आठवणीने घायाळ झालेल्या मातापित्यांनी जड अंतःकरणाने बाळाचा चेहरा डोळ्यांत व आठवणींना हृदयात साठवून तडवळे गावचा निरोप घेतला.

आनंदगाव (ता. माजलगाव, जि. बीड) येथील शमशुद्दीन निजामुद्दीन शेख हे आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुफीयान या मुलासह शिराळा तालुक्यात ऊसतोडणीसाठी आले होते. शमशुद्दीन यास दोन मुले. मोठी मुलगी व लहान मुलगा. मुलगी चार वर्षांची असल्याने ती गावी होती. मुफीयान एक वर्षाचा असल्याने सोबत होता.

सोमवार, दि. २२ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शमशुद्दीन शेख आपल्या पत्नी व मुलासह ऊसतोडणीसाठी तडवळे येथे शेतात गेले होते. मुफीयानला एका झाडाखाली मेहुणीची सात वर्षांची मुलगी तरनुम हिच्यासोबत ठेवले होते. सर्वजण ऊस तोडण्यात मग्न होते. यावेळी बिबट्याने पाठीमागून सुफीयान याच्यावर झडप घालून त्यास आईवडिलांसमोरच फरफटत नेले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

शेख कुटुंबीयांवर शोककळा पसरली. गाव जवळ नसल्याने मुफीयानला शिराळा येथेच दफन केले. या ठिकाणी राहिलो तर बाळाच्या आठवणी सतावत राहणार म्हणून शेख कुटुंबाने कोयता सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर त्वरित वनविभागाने मृत बालकाच्या कुटुंबीयांना मदत दिल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

चाैकट

मदतीचा हात

शेख कुटुंबीयांना सामाजिक कार्यकर्ते डी.जी. आत्तार, सहायक वनसंरक्षक सांगली गजानन चव्हाण, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनपाल चंद्रकांत देशमुख, हणमंत पाटील, युवराज पाटील, खिदमत ग्रुपचे असलम नदाफ, फिरोज मुजावर, आसिफ मुजावर, रफिक आत्तार, झाकीर दिवाण, मुस्लिम समाज ट्रस्ट खलील मोमीन, मेहबूब मुल्ला, ॲडव्होकेट गौस बाबालाल मुजावर यांनी या कुटुंबास मदत केली.

कृपया वरील बातमीतील बाळाचे नाव मुफीयान की सुफीयान हे विचारून घेणे.