शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डावा कालव्याचे काम बंद!

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

कालव्याची दुरवस्था : उर्जितावस्था कधी येणार?

सहदेव खोत - पुनवतमागील दोन वर्षापासून बंद पडलेली कामे, जागोजागी उखडलेले काँक्रिटीकरण, आत आणि बाहेर झुडपांचे वाढलेले साम्राज्य यामुळे शिराळा तालुक्यात वारणा डावा कालव्याची दुरवस्था झाली आहे. केंद्रात आणि राज्यात नव्यानेच सत्तारुढ झालेल्या भाजप सरकारच्या काळात तरी या कालव्याला उर्जितावस्था येणार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.दोन-तीन वर्षापूर्वी डाव्या कालव्याची कामे जागोजागी जोमाने सुरू होती. अनेक ठिकाणी कालव्याची साफसफाई करून साईड काँक्रिटची कामे करण्यात आली. ही कामे विशेषत: १0 कि.मी.पासून पुढे करण्यात आली. रिळे जलसेतूपर्यंत पाण्याची चाचणीही घेण्यात आली होती.कामाचा ठेका घेणाऱ्या कंपनीने कधीकाळी कामे केल्यानंतर आता आपला गाशा गुंडाळला आहे. साधारणत: रिळे जलसेतूपासून ते अगदी मांगले देववाडीपर्यंत ही कामे अर्ध्यावरच राहिली आहेत. कित्येक ठिकाणी केलेले अस्तरीकरण निकृष्ट कामामुळे उखडून गेले आहे. शिल्लक राहिलेल्या अस्तरीकरणाला भेगा पडल्या आहेत. त्यामधून झाडे—झुडपे उगवली आहेत. अस्तरीकरण नीट न झाल्यामुळे कालव्यात पावसाळ्यात साठलेले पाणी झिरपून निघून गेले आहे. कालव्याच्या दुतर्फा तसेच आत मोठमोठी झाडे उगवल्यामुळे कालव्याचा धोका वाढला आहे. शिवाय 0 ते २0 कि.मी.पर्यंतच्या पट्ट्यात गळतीची समस्या मोठी आहे. सततच्या पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी नापीक बनल्या आहेत.तालुक्यात विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक या नेत्यांनी वाकुर्डे बुद्रुक योजना व डावा कालवा पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सध्या निधीअभावी या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजना रखडल्या आहे. कॉँग्रेस शासनाच्या काळात या योजनांसाठी निधी आला व कामेही झाली. आता कामात राहिलेल्या उणिवा दूर करून उर्वरित कामे मार्गी लावण्याची गरज आहे.कालव्याचे काँक्रिट तुटलेल्या ठिकाणी कोटिंग कागदाची चोरीही झाली आहे. कामे बंद असल्यामुळे खोलीच्या ठिकाणी असलेल्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दरवर्षी कालव्यात पडून कित्येक जनावरांचा मृत्यू होत आहे. काही ठिकाणी बसविलेले लोखंडी पूल कालबाह्य झाले आहेत. सततच्या पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी नापीक बनल्या आहेत.