शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी लढतेय राष्ट्रीय धोरणावर, भाजप स्थानिक प्रश्नावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST

सांगली : कोरोना काळातील कामाबरोबरच लोकांचे प्रश्न मांडून राजकीय पटलावरील आपले स्थान बळकट करण्यासाठी सर्वच पक्षांची सध्या धडपड सुरु ...

सांगली : कोरोना काळातील कामाबरोबरच लोकांचे प्रश्न मांडून राजकीय पटलावरील आपले स्थान बळकट करण्यासाठी सर्वच पक्षांची सध्या धडपड सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी स्वतंत्रपणे केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलने करत आहे, तर भाजपने राज्याच्या विशेषत: स्थानिक प्रश्नांवर आंदोलनांचा सपाटा लावला आहे.

इंधन, गॅस दरवाढीसारखे मुद्दे घेऊन सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी वेगवेगळी आंदोलने करत आहेत. स्थानिक पातळीवर महापालिकेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तास्थानी आहे. राज्यातही महाविकास आघाडी सत्तेत आहे. त्यामुळे लढायला केवळ केंद्र शासनाचा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे. याशिवाय इंधन, गॅस दरवाढ, महागाई, बेरोजगारी अशा विषयांचे आयते कुरण केंद्र शासनाने दिले आहे. या प्रश्नांवरुन आघाडीने भाजप नेत्यांची कोंडी केली आहे. लोकांसमोर जाताना त्यांना या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे केंद्र शासनाविरोधात सुरु असलेली दरवाढ, महागाईची ओरड दुर्लक्षित करण्यासाठी भाजपने आता राज्य शासन, विशेषत: स्थानिक प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. कोरोना काळात रुग्णांची लूट, रुग्णांचे मृत्यू, हलगर्जीपणा या गोष्टींवरुन आंदोलने केली जात आहेत. राज्य शासनाच्या धोरणांविरोधातही भाजप आंदोलन, विरोध करत आहे. आरक्षणाचा मुद्दाही सर्वच राजकीय पक्षांच्या पटलावर असला तरी त्यात सावध भूमिका दिसून येते. यात सर्वच पक्ष सध्या अडचणीत सापडले आहेत. हा मुद्दा केंद्र व राज्य दोन्हींच्या अखत्यारित असल्याने राजकारणी जपून पावले टाकत आहेत. सध्या आंदोलनांचा जिल्ह्यात धडाका सुरु आहे. प्रत्येक पक्ष आंदोलनात उतरुन आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे.

चौकट

लसीच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष

जिल्ह्यात सध्या लसीचा तुटवडा आहे. लस मिळत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे, मात्र याबद्दल सर्वपक्षीय राजकारणी सध्या शांत आहेत. केंद्र शासन व राज्य शासन दोघांचेही गैरनियोजन यात दिसत असल्याने याबाबत सत्ताधारी व विरोधक मौन बाळगत आहेत.

चौकट

कोरोनातील व्याप कमी झाला

कोरोना काळात ऑक्सिजन, बेडची टंचाई असताना सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते सामाजिक कामात व्यस्त होते. मात्र, आता हा व्याप कमी झाल्याने ते राजकीय मैदानात ताकद आजमावू लागले आहेत.