शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाह समारंभात नेत्यांची रेलचेल

By admin | Updated: May 4, 2016 00:47 IST

उपस्थितीसाठी कसरत : कार्यकर्त्यांची मर्जी राखण्याचा आटोकाट प्रयत्न

अशोक पाटील --इस्लामपूर -दि. ३० एप्रिल व १ मे या दोन दिवशी विवाह समारंभांनी रेकॉर्ड ब्रेक केले. या समारंभास हजेरी लावण्यासाठी वाळवा व शिराळा तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली. आलेल्या निमंत्रण पत्रिकेची शहानिशा करुन, जवळचा आणि दूरचा कोण? याचा विचार करुनच बहुतांशी नेत्यांनी विवाह समारंभास उपस्थित राहणे पसंद केले. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तरीसुध्दा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळवा—शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्यापासून ते गावातील सरपंच पदापर्यंत असणाऱ्या सर्वच नेतेमंडळींनी लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.वाळवा, शिराळ्यात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचा गट मोठा आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना आपल्या लग्नसमारंभास आणण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचाच आग्रह असतो. स्वत: जयंत पाटील यांनीही कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरातील लग्नसमारंभ चुकू नये, म्हणून आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच उपस्थितीत लग्नसमारंभ पार पाडण्यासाठी काहींनी लग्नाची तारीख आणि मुहूर्ताच्या वेळेतही बदल केल्याची चर्चा आहे. तसेच काही कार्यकर्त्यांनी निमंत्रणपत्रिका देतानाच आपल्या वधू—वरांना सोबत घेऊन, त्यांच्याचहस्ते पत्रिका देऊन, तसेच त्यांचे आशीर्वाद घेऊन, काहीही झाले तरी लग्नाला उपस्थिती हवीच, असाही आग्रह केल्याचे समजते. जयंत पाटील यांनीही याची दखल घेत, ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवसातील लग्नसमारंभांना मॅरेथॉन भेटी देऊन रेकॉर्ड ब्रेक केले.वाळवा तालुक्यातीलच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. पाटील यांच्यासह राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकाऱ्यांनाही, लग्नसमारंभास उपस्थिती लावताना तारेवरची कसरत करावी लागली.शिराळा तालुक्यातील नेत्यांचीही अवस्था अशीच आहे. येथे तीन गट सक्रिय असल्याने लग्नसमारंभास उपस्थिती लावण्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. माजी मंत्री, आमदार शिवाजीराव देशमुख यांची प्रकृती साथ देत नसली तरी, ते आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जमेल तेवढ्या लग्नसमारंभांना उपस्थित राहत आहेत. परंतु त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख कार्यकर्त्यांच्या प्रत्येक समारंभास न चुकता उपस्थित राहत आहेत. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक हे पूर्वीपासूनच प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहण्यात अग्रेसर आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचे त्यांच्यावर प्रेम आहे. आ. नाईक यांनी जमेल तेवढ्या लग्नसमारंभास उपस्थिती लावली. जेथे स्वत: जाणे शक्य नाही, तेथे त्यांनी आपल्या घरातील जि. प. सदस्य रणधीर नाईक व इतरांना उपस्थिती लावण्याचे नियोजन केले. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनीही जास्तीत जास्त विवाह समारंभांना आवर्जून उपस्थिती लावत, आपणही काही कमी नाही, असेच दाखवून दिले आहे.वाहतुकीची कोंडी : मुहूर्त चुकले३० एप्रिल व १ मे या दोन दिवशी लग्नसमारंभाचे बरेच मुहूर्त होते. घरासमोरील मंडपामधून ते मोठ्या कार्यालयांत लग्नाची धामधूम सुरु होती. इस्लामपूर व शिराळा शहरातील मंगल कार्यालयांत असलेल्या विवाह समारंभांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती. या वाहनांच्या कोंडीमुळे अनेकांना विवाह मुहूर्त गाठणे जमले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळवा—शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्यापासून ते गावातील सरपंच पदापर्यंत असणाऱ्या सर्वच नेत्यांनी लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.