शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण धास्तीने नेते अस्वस्थ

By admin | Updated: July 1, 2016 23:36 IST

इस्लामपूर नगरपरिषद : आज अठ्ठावीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत

अशोक पाटील -- इस्लामपूर शहरातील २८ प्रभागांतील आरक्षण सोडत २ रोजी राजारामबापू नाट्यगृहात होत आहे. खुल्या वर्गातील नगरसेवकांनी निवडणुकीच्या अगोदरच देव पाण्यात घातले आहेत. परंतु त्यांचे सर्व लक्ष आज होणाऱ्या आरक्षणाकडे लागले आहे. आपल्या हक्काच्या प्रभागाला काय आरक्षण पडते, याची धास्ती खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना लागून राहिली आहे. नगराध्यक्ष निवडणूक जनतेतून होणार आहे. खुले पुरूष आरक्षण पडल्यास राष्ट्रवादीपुढे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही. खुले महिला आरक्षण पडल्यास माजी नगराध्यक्षा सौ. अरूणादेवी पाटील यांच्याशिवाय राष्ट्रवादीत सक्षम महिला नाही. दोघेही सध्या विद्यमान नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपद हे इतर वर्गासाठी पडले, तर त्यांच्या हक्काच्या प्रभागात काय आरक्षण पडते, याची धास्ती विजयभाऊ पाटील आणि खासदार एस. डी. पाटील यांच्या घराण्याला लागली आहे. गेल्या ३५ वर्षाहून अधिक काळ पालिकेत नगरसेवक पदावर कार्यरत असलेले बी. ए. पाटील हे नेहमी आपल्या हक्काच्या प्रभागात सक्रिय असतात. ९५ च्या निवडणुकीत महिला आरक्षण असल्यामुळे पत्नी सौ. शारदा पाटील यांना नगरसेवक पदाची संधी देऊन निवडून आणले होते. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष पद हे खेचून आणले होते. त्यांचे चिरंजीव डॉ. संग्राम पाटील हेही गत निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. परंतु पिता-पुत्रात कुठे माशी शिंकली, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. त्यामुळे बी. ए. पाटील निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. सध्या पिता-पुत्र पाटील हक्काच्या प्रभागात काय आरक्षण पडते याकडे लक्ष ठेवून आहेत. एन. ए. ग्रुपमधील विद्यमान नगरसेवक खंडेराव जाधव, सौ. मनीषा पाटील यांचेही हक्काचे प्रभाग ठरलेले आहेत. एन. ए. गु्रपचे जयवंत पाटील यांनी यापूर्वी दुसऱ्या प्रभागात जाऊन निवडणूक लढविली होती. त्यामुळे खंडेराव जाधव आणि मनीषा पाटील इतर प्रभागातही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या दोघांना आरक्षणाशी काही देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. अशीच अवस्था विरोधी गटात आहे. भाजपचे विक्रमभाऊ पाटील, सौ. शुभांगी पाटील, कॉँग्रेसचे वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार यांनाही आरक्षणाची धास्ती लागून राहिली आहे. विरोधी गटात नगराध्यक्ष पदासाठी सक्षम नेतृत्व नाही. निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली तरी, विरोधकांच्यात आजही ताळमेळ नाही. त्यामुळेच सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये खुल्या वर्गातील इच्छुकांमध्ये रेलचेल आहे. त्यामुळे आज होणाऱ्या आरक्षणाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अष्टपैलू : खेळाडू...पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे वय झाले असले तरी सध्या ते निवडणुकीच्या रणांगणात मोठ्या उमेदीने उतरणार असल्याचे चित्र आहे. परंतु त्यांच्याच घरातील विद्यमान नगरसेवक शहाजी पाटील, शिवराज पाटील आणि राजवर्धन पाटील हेही निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत. यावर विजय पाटील काय तोडगा काढतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.