शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांच्या गर्दीने नेते हैराण

By admin | Updated: June 24, 2015 00:46 IST

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती : २६ जूननंतरच चित्र स्पष्ट होणार

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात असल्यामुळे इच्छुकांची संख्या दोनशेहून अधिक आहे. एकीकडे नेत्यांच्या आघाडीसाठी बैठका सुरू असताना दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढल्याने नेत्यांची डोकेदुखी झाली आहे. बहुतांशी नेते, आमदार आता मुंबईत असल्यामुळे बाजार समितीचे चित्र २५ व २६ जूनलाच स्पष्ट होणार आहे.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल सात वर्षांनी होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या भरमसाट वाढली आहे. केवळ जतमधूनच भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्याकडे ४५ हून अधिकजणांनी मागणी केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून ५०, तर मिरज तालुक्यातून शंभरहून अधिक जणांनी भाजपसह इतर पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अजितराव घोरपडे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार एकत्रित आले. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. आता मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीनंतर समीकरणे बदलली आहेत. पतंगराव कदम गट मदन पाटील यांच्यावर नाराज असल्यामुळे निवडणूक अटळ असल्याचे बोलले जात आहे. आ. जगताप यांनी मदन पाटील, विशाल पाटील यांच्याशी चर्चाही सुरूकेली आहे. नेतेमंडळींची कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असल्यामुळे अद्याप कोणीही निर्णय जाहीर केलेला नाही. जिल्ह्यातील आमदार व नेतेमंडळी सध्या मुंबईत असल्यामुळे याच ठिकाणी निवडणुकीची आघाडी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे २६ जूननंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)तिसऱ्या आघाडीची स्थापना होणारसमितीमध्ये भाजप, काँग्रेसच्या आघाडीची चर्चा सुरू असतानाच आता तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मंगळवारी माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संजय बेले यांची बैठक झाली. येत्या दोन दिवसात खा. राजू शेट्टी यांच्याबरोबरही चर्चा होणार आहे. समविचारी पक्षांना एकत्रित आणून या निवडणुकीत कडवे आव्हान उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तिसऱ्या आघाडीसाठी शेट्टी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपची इतर पक्षांशी आघाडी सुरू असल्यामुळे शिवसेना नेते राज्यपातळीवरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ४९ अर्जांची विक्रीमिरज : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी २९ अर्जांची विक्री झाली. दोन दिवसात ४९ अर्जांची विक्री झाली असून एकही अर्ज दाखल झालेला नाही. भीमराव माने, माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांचा, अर्ज विकत घेणाऱ्यांत समावेश आहे.केवळ शंभर रुपये अनामत रकमेने संख्या वाढणारकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी केवळ शंभर रुपये अनामत रक्कम केल्याने उमेदवारांची संख्या वाढणार आहे. कोल्हापूर बाजार समितीसाठी नऊशेहून अधिक जणांनी उमेदवारी दाखल केल्याचे समजते. याच धर्तीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार माघार घेताना नेतेमंडळींची दमछाक होण्याची शक्यता आहे.