शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकाºयांची तलाठ्यास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगावचे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांनी, वाळू वाहतूक करणारे ट्रक न पकडल्यामुळे कुंडलचे तलाठी एन. जी. आत्तार यांना भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली आणि दोन दिवसात चार ट्रक पकडले नाहीत, तर निलंबित करेन, असा दम दिला. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, सांगली शाखेने आज सोमवारी ७/१२ संगणकीकरणाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगावचे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांनी, वाळू वाहतूक करणारे ट्रक न पकडल्यामुळे कुंडलचे तलाठी एन. जी. आत्तार यांना भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली आणि दोन दिवसात चार ट्रक पकडले नाहीत, तर निलंबित करेन, असा दम दिला. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, सांगली शाखेने आज सोमवारी ७/१२ संगणकीकरणाचे काम बंद ठेवले आणि प्रवीण साळुंखे यांच्यावर कारवाई न झाल्यास उद्या मंगळवारपासून निवडणूक कामकाज वगळता अन्य सर्व कामे बंद करण्याचा इशारा दिला आहे.कडेगाव तालुक्यात येरळा नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. बहुतांशी वाळूचे ट्रक कुंडलमार्गे पलूस तालुक्यात जातात. त्यामुळे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांनी कुंडल तेथील तलाठी एन. जी. आत्तार यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांच्या निदर्शनास आले. यावरून संतप्त झालेल्या प्रांताधिकारी साळुंखे यांनी तलाठी एन. जी. आत्तार यांना काय करताय, वरिष्ठ अधिकारी वाळू ट्रक मागे आणि तुम्ही झोपा काढताय का? कुंडलमध्ये एक तरी वाळू वाहन पकडले का? असा जाब विचारत शिवीगाळ केली आणि दोन दिवसात चार ट्रक पकडले नाहीत, तर निलंबित करेन, असा दम भरला.या घटनेचा निषेध करून प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांच्यावर कारवाई करा, अन्यथा तलाठी संघटनेने आज मंगळवारपासून निवडणूक कामकाज वगळता अन्य काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना देण्यात येणार आहे. यानंतर संघटना निर्णय घेणार असल्याचे समजते.हप्ते घेताय आणि ट्रक पकडत नाहीप्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांनी तलाठी एन. जी. आत्तार यांना हप्ते घेताय आणि ट्रक पकडत नाही, असा संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसात बेकायदा वाळूचे ट्रक पकडले नाहीत, तर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी तलाठी अत्तार यांना दिला. यावरून महसूल खात्यातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. याची चर्चा आज महसूल विभागात होती. याबाबत उद्या तलाठी संघटना काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.