शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी, जकात रद्द करा

By admin | Updated: November 5, 2014 00:56 IST

कारवाई थांबवा : व्यापाऱ्यांची मागणी; मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देणार

नवी मुंबई/सांगली : भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी व्यापारी वर्गाला दिलेल्या लेखी आश्वासनानुसार एलबीटी व जकात रद्द करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’च्यावतीने (फॅम) करण्यात आली आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंगळवारी रात्री उशिरा बैठक होणार होती. त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा होण्याची शक्यता ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी व्यक्त केली.एलबीटीप्रश्नी मंगळवारी राज्यातील व्यापारी प्रतिनिधी, तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक आयोजित केली होती. नियोजित वेळेत बैठक सुरू झाली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी वाशी येथील चेंबर हॉलमध्ये बैठक घेतली. बैठकीला महाराष्ट्रातील २६ पैकी २५ महापालिका क्षेत्रांतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले. गुरनानी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत व्यापाऱ्यांनी एलबीटीविरोधातील कारवाईबद्दल संताप व्यक्त केला. बैठकीविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना गुरनानी म्हणाले की, महाराष्ट्रातील २६ पैकी २५ महापालिका क्षेत्रांत एलबीटी लागू करण्यात आला आहे. एलबीटी व जकातला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी मागील तीन वर्षापासून व्यापाऱ्यांचे विविध स्तरांवर आंदोलन सुरू आहे. सत्तेवर आल्यावर एलबीटी आणि जकात रद्द करण्याचे लेखी आश्वासन भाजप व शिवसेनेने दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील व्यापारी वर्गाने निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी मंगळवारी रात्री व्यापारी प्रतिनिधी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार होते. नियोजित वेळेत बैठक सुरू न झाल्याने रात्री उशिरा बैठकीचे आयोजन करण्यात आले. (प्रतिनिधी)या मागण्या करणारएलबीटी वसुलीसाठी महापालिकांकडून व्यापाऱ्यांचा छळ होत आहे. त्यांना विविध प्रकारे पिडले जात आहे. यासंदर्भात निर्णय होईपर्यंत या कर आकारणीला स्थगिती द्यावी, महाराष्ट्रात समान कर प्रणालीचा अवलंब करावा, आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांवर भरण्यात आलेले खटले काढून घ्यावेत, आदी मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे गुरनानी यांनी सांगितले.