शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर सांगली जिल्हा झाला टँकरमुक्त

By admin | Updated: August 31, 2014 23:48 IST

पाणीसाठाही वाढला : सलग दोन वर्षाच्या दुष्काळानंतर मिळाला दिलासा-लोकमत विशेष

अंजर अथणीकर -सांगली -सलग दोन वर्षे दुष्काळाच्या छायेखाली असणाऱ्या सांगली जिल्ह्याला आॅगस्टमधील पावसाने मात्र दिलासा मिळाला आहे. दोन वर्षापासून सांगली जिल्ह्यात सुरु असलेले सर्व टँकर पहिल्यांदाच बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठाही आता ४० टक्क्याच्या वर गेला आहे. जुलै उजाडला तरी पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जुलैमध्ये जिल्ह्यातील टँकरची संख्या तीसवर होती. जुलैनंतर चांगला पाऊस सुरु झाला. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली होती. तलावांतील पाणीसाठा संपून विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला होता. चांदोली, कोयना या धरणांमध्ये पाणीसाठा वीस टक्क्याच्या खाली गेला होता. आॅगस्टमध्ये झालेल्या दिलासादायक पावसामुळे दुष्काळ हटला आहे. वारणा धरण शंभर टक्के भरलेजिल्ह्यातील वारणा धरण आता शंभर टक्के भरले आहे. धरणामध्ये ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात ९६.१२ टीएमसी, धोममध्ये १२.४३ व कण्हेरमध्ये ९.८० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना ९१.३२, धोम ९२.११ व कण्हेर धरण ९७.०४ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील तलावांमध्ये आता ७५ टक्क्यापर्यंत पाणीसाठा झाला आहे.दोन कोटीचा खर्चजत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तसेच मिरज तालुक्यात यावर्षीही टँकर सुरु करण्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा चारा छावण्या सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती. जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात आॅगस्टमध्ये सरासरीच्या तुुलनेत १५२.२ टक्के इतका पाऊस झाला आहे. सरासरीमध्ये हा पाऊस ४५२.४ मि.मी. इतका आहे. विशेष म्हणजे हा पाऊस सर्वच तालुक्यात आहे. सांगली जिल्ह्यातील पाणीसाठाही ४० टक्क्याहून अधिक वाढला आहे. यामुळे ३० आॅगस्टपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी जत तालुक्यात दोन व कवठेमहांकाळ तालुक्यात १ टँकर सुरु होता. उन्हाळ्यात १६२ टॅँकर सुरु करण्यात आले होते. सुमारे दोन कोटीहून अधिक रुपये टँकरवर खर्च करण्यात आले होते.