शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर परिसरात भूखंड माफियांचा झाला शिरकाव...

By admin | Updated: March 3, 2016 00:04 IST

जमिनींचे दर भडकले : पेठ, कापूसखेड, कामेरी, साखराळेतील चित्र, खरेदी व्यवहारात गावगुंडानीही सुरू केली दलाली

अशोक पाटील -- इस्लामपूर इस्लामपूर शहराचा चारही दिशेने विस्तार वाढला असून, मध्यवर्ती ठिकाणच्या जागेचे मोल करणे अशक्य झाले आहे. शहरालगतच्या पेठ, कापूसखेड, कामेरी, साखराळे हद्दीतील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या परिसरातही भूखंड माफियांचा शिरकाव झाला आहे. जागांचे खरेदी व्यवहार होण्यासाठी काही गावगुंडांनी दलाली सुरू केली आहे. यातून गुन्हेगारी बोकाळत चालली आहे.इस्लामपूर शहरात औद्योगिक, शिक्षण, व्यापार या क्षेत्रांचा विस्तार होत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील सधन शेतकरी शहरात वास्तव्यास येत आहेत. त्यातून शहरातील मोक्याच्या जागांचे भाव भडकले आहेत. व्यापारी संकुलांची संख्या वाढू लागली आहे. शंभर चौरस फूट गाळ्याचा दर २० ते २५ लाखांच्या घरात गेला आहे. बाजारपेठ, बसस्थानक, शिक्षण संस्था या परिसरात मोकळ्या जागा मिळत नाहीत. सदनिकांचे दर ३५०० ते ४००० रुपये चौरस फूट आहेत. उपनगरातील सदनिकांचे दर २५०० रुपये चौरस फूट आहेत. त्या खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने त्यांनी शहरापासून तीन ते पाच किलोमीटरवरील कापूसखेड, साखराळे, कामेरी, पेठ या ग्रामपंचायत हद्दीत जागा घेणे पसंद केले आहे. त्यामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागातील जागांचे भावही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.इस्लामपूर-सांगली आणि वाळवा रस्त्यावरील जमीन क्षारपड आहे. त्यामुळे तेथे बांधकाम करण्यासाठी ३० ते ४० फूट पाया काढावा लागत आहे. परिणामी त्या बाजूला जागा घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. राजारामबापू साखर कारखाना परिसर व साखराळे हद्दीतील माळरानाचा लाखोंचा भाव मिळत आहे. तेथे १० ते १५ लाख रुपये गुंठा असा दर सुरू आहे. अशीच परिस्थिती कापूसखेड, कामेरी, पेठ या गावांच्या हद्दीतील जागांची आहे.या जागा खरेदी करण्यासाठी इस्लामपूर शहरातील भूखंड माफिया सरसावले आहेत. मुंबई, पुणे शहरात अवैध व्यवसायांतून मिळवलेला पैसा या भूखंड माफियांमार्फत मुरवला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या जमीन वादातूनच अनेकवेळा खून, मारामाऱ्या असे प्रकार घडले आहेत. नुकत्याच झालेल्या पेठ येथील सुकुमार पवार यांच्या मृत्यूला जमीन खरेदी-विक्री व्यवहारच कारणीभूत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.