येथील दिघंची रस्त्यावरील शासकीय धान्याच्या गोदामासमोर जयभवानीनगर आहे. तिथे राहणारे
पृथ्वीराज हणमंतराव पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी डल्ला मारला.
पाटील कुटुंबीय सकाळी ११ वाजता घराला कुलूप लावून डाळिंबांच्या बागेत गेले होते. दुपारी दीड वाजता ते घरी जेवण्यासाठी परत आले. त्या कालावधीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून, घरात प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम ३५ हजार, सोन्याचे एक तोळ्याचे कानातील अलंकार, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीचे दोन गणपती, ताट, दोन करंडे, एक निरांजन लंपास केले. पाटील घरासमोर आले असताना कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. घरात प्रवेश करताच चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आटपाडी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. हवालदार गणपत गावडे अधिक तपास करीत आहेत.