कुपवाड : औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या कुशल मनुष्यबळाची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली आहे, असे प्रतिपादन पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वेल्डींग संस्थेचे अध्यक्ष विनित मराठे यांनी केले. मिरज एमआयडीसीमधील सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, माजी अध्यक्ष के. एस. भंडारे प्रमुख उपस्थित होते. मराठे म्हणाले की, फॅब्रिकेशन उद्योगात वेल्डींग कामात उद्योजकांना बऱ्याचवेळा समस्या निर्माण होतात. त्यामुळे उद्योजकांनी त्यावर उपाययोजना म्हणून वेल्डींग क्षेत्रात विकसित झालेल्या नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. उद्योगामध्ये सध्या प्रमाणित वेल्डर्स आणि इंजिनिअर्स यांची आवश्यकता असते. त्यामुळेच औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजकांना त्यांच्याकडील वेल्डरना प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त ठरते. अशावेळी इंडियन इन्स्टिट्यूटतर्फे कमी खर्चात कुशल वेल्डर तयार करण्यात येतात. वेल्डींग क्षेत्रात देशपातळीवर ही संस्था कार्यरत आहे. सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके यांनी स्वागत केले. के. एस. भंडारे यांनी आभार मानले. चर्चासत्रास असोसिएशनचे संचालक विजय भोसले, उद्योजक जयपाल चिंचवाडे, अजय खांबे, विजय भंडारे यांच्यासह असोसिएशनचे व्यवस्थापक गणेश निकम व मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)मुंबईत राष्ट्रीय चर्चासत्रवेल्डींगच्या तंत्रामध्ये झालेले आमूलाग्र बदल, क्रांती व तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी मुंबई येथे ९ ते १२ डिसेंबरदरम्यान राष्ट्रीय वेल्डींग चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने वेल्ड इंडिया प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठे यांनी केले.
उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता
By admin | Updated: December 1, 2015 00:11 IST