शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाळीव पशूंच्या संख्येत मोठी घट...

By admin | Updated: December 10, 2014 23:49 IST

पंचवार्षिक गणती : सात वर्षात गाई, म्हैशी, शेळ््या, मेंढ्यांची संख्या दोन लाखांनी घटली

सदानंद औंधे - मिरज -वाढते शहरीकरण, चाऱ्याची दरवाढ, कमी उत्पन्न, दुष्काळ, पाणीटंचाई यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात पशुपालकांची व पाळीव जनावरांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या संख्येत गेल्या सात वर्षात मोठी घट झाली असून पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पशुगणतीत गाई, म्हैशी, शेळ्या व मेंढ्यांच्या संख्येत दोन लाखांची घट झाली आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे दर पाच वर्षांनी जिल्ह्यातील पाळीव जनावरांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या मोजण्यात येते. जिल्ह्यात यापूर्वी २००७ मध्ये पशुगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ च्या पशुगणनेचे काम दोन वर्षांनी पूर्ण होऊन पशुगणनेची आकडेवारी तयार झाली आहे. २००७ मध्ये १ कोटी ५६ लाख १९९३ एवढ्या पाळीव प्राण्यांच्या संख्येत घट होऊन १ कोटी ३८ लाख २७१७ एवढी सध्याची पाळीव प्राण्यांची संख्या आहे. पोल्ट्री व्यावसायिक व पोल्ट्री कोंबड्यांच्या संख्येत तर मोठी घट झाल्याचे ताज्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. २६ लाख ४३ हजार असलेल्या पाळीव कोंबड्यांची संख्या आता केवळ ८ लाख ८७ हजार ८१० एवढी आहे. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या संख्येत तब्बल तीन लाखाने कमी झाली आहे. पशुखाद्य व मजुरीचे वाढते दर, अंड्यांचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने व बर्ड फ्लूच्या संकटाने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची संख्या कमी होत आहे. पाळीव कुत्र्यांची संख्याही २७ हजाराने, तर गाई व म्हैशींची संख्या ४० हजाराने कमी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने वर्षभर जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांमार्फत गणना केली आहे. वाढते शहरीकरण, चारा व पशुखाद्याची दरवाढ, पशुपालनापासून मिळणारे कमी उत्पन्न, पाणीटंचाई व शिक्षित व्यक्ती पशुपालनापासून दूर असल्याने पाळीव प्राण्यांची संख्या कमी होत असल्याचा अंदाज पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश बनसोडे यांनी व्यक्त केला. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पशूंना आवश्यक वैद्यकीय सुविधा, लसीकरणासह विविध कामांचे नियोजन करण्यात येते. जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार ६३३ म्हैशी व ३४ हजार २३४ रेड्यांची संख्या आहे. बैलांची संख्या ७९ हजार ३२६, तर गाई १ लाख ७० हजार ७३४ आहेत. गार्इंपैकी ३४ हजार ७६४ दूध देणाऱ्या, २७ हजार १६७ भाकड व ३०५५ वांझ आहेत. जर्सी गार्इंची संख्या १ लाख ६१ हजार ८०२ एवढी आहे.४घोडे, गाढवांची संख्या वाढलीसर्वच पाळीव प्राण्यांची संख्या घटत असताना, पाळीव घोडे व गाढवांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. घोड्यांच्या संख्येत केवळ तीनने वाढ झाली आहे, तर गाढवांची संख्या सहाशेने वाढली आहे. पाळीव बदकांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही. सात वर्षातील आकडेजनावरे २00७ २0१२बैल, गाई ३,०८,०५२३,४१,५४७म्हैशी ५,३६,९९६४,९२,६३३मेंढ्या२,११,२२२ १,५७,३९०शेळ्या ४,०९,८६० ३,२४,६३२घोडे७६२ ७६५खेचर८२ ८०गाढवे ९७८ १,६७८डुकरे ५,९३५३,७५६कुत्री ८७,८१७६०,१३२ससे २८९१०४एकूण १५,६१,९९३१३,८२,७१७२00७ मध्ये देशी कोंबड्या व इतर पक्षी २६ लाख ८३ हजार १४३, तर पोल्ट्री कोंबड्या ५५ लाख ८२ हजार ८०९ होत्या. सात वर्षानंतर देशी कोंबड्या ८ लाख ८७ हजार ८१0, तर पोल्ट्री कोंबड्यांची संख्या २१ लाख ३९ हजार ५७२ वर गेली.