कुपवाड : शहरात विनामास्क फिरणाऱ्यांकडून व काही दुकानदारांकडून तोंडावर मास्क नसल्याच्या कारणावरून कुपवाड पोलिसांनी सात हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती साहाय्यक निरीक्षक निरज उबाळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानुसार कुपवाड पोलिसांनी रविवारी सायंकाळी ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली. शहरातील मुख्य रस्त्यावर, सोसायटी चौक, मंगळवार बाजार पेठ या परिसरातील काही दुकानदारांनी व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तोंडावर मास्क न लावल्याने शासनाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी ७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सोसायटी चौक, मंगळवार बाजार पेठ आणि मुख्य रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.