शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लूच्या संशयाने कुपवाड परिसर भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:23 IST

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीलगत पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यानंतर बर्ड फ्लूच्या संशयाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित ...

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीलगत पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यानंतर बर्ड फ्लूच्या संशयाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित ठिकाणास केंद्रबिंदू मानून १० किलोमीटर त्रिज्येतील चिकन दुकाने व चायनीज सेंटर आणि चिकन ६५ हे व्यवसाय प्रशासनाने बंद करावेत, अशी मागणी आहे.

राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या व इतर पक्षी दगावल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासन सतर्क झाले आहे. अशातच सावळी हद्दीतील एका कंपनीच्या आवारात पक्षी मृत झाल्याचे आढळून आले. त्यामुळे कुपवाड, सावळी, बामणोली, कानडवाडी, तानंग, मानमोडी परिसरांतील नागरिक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी पक्षी मृत्युमुखी पडल्याचे आढळल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.

यामध्ये त्यांनी मृत पक्षी आढळून आलेल्या ठिकाणास केंद्रबिंदू मानून १० किलोमीटर त्रिज्येतील परिसरामध्ये कुक्कुटपक्ष्यांची, पक्षीखाद्यांची, अंडी खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घातला आहे. सावळी हे गाव ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या पक्ष्यांच्या मृत्यूच्या कारणाचे निष्कर्ष येणे अद्याप बाकी आहे. कुपवाड शहरासह विस्तारित परिसरात अनेक ठिकाणी चिकन दुकाने, चायनीज सेंटर, चिकन ६५ खाद्यपदार्थ व्यवसायाचे हातगाडे आहेत. हे व्यवसाय जिल्हा प्रशासनाने अहवाल येईलपर्यंत बंद करावेत. बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यास आणि यातून अनर्थ घडल्यास होणाऱ्या धोक्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. हा अनर्थ टाळण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.