सांगली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, तिसऱ्या लाटेला लसीकरणाच्या अस्त्राने रोखण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातून यास माेठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील कुंडल, भिलवडी, कुरळप, नांद्रे, कवलापूर ही आरोग्य केंद्रे सध्या लसीकरणात टॉपला आहेत. एकूण लसीकरणामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण हे तब्बल ४१ टक्के इतके आहे.
लसीकरणावर प्रशासनाचा अधिक भर असून, बुधवारी महालसीकरणांतर्गत एकाच दिवसात १ लाख ४५ हजार ८८६ लोकांचे लसीकरण झाले. लसीकरणाचा हा धडाका यापुढेही कायम ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. लसीकरणासाठी ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. शहरातील आरोग्य केंद्र व रुग्णालयातील लसीकरणापेक्षा ग्रामीण केंद्रांमधील लसीकरणाच वेग अधिक आहे.
चौकट
लसीकरणातील टॉप केंद्रे
केंद्र लसीकरण
कुंडल ४२,७७३
भिलवडी ३७,३७२
कुरळप ३२,९८२
नांद्रे ३०,०४७
कवलापूर २९,५८८
कवठेपिरान २९,२९६
उ. वि. रुग्णालय इस्लामपूर २७,१३०
विटा ग्रामीण रुग्णालय २५,७४९
बोरगाव आ. केंद्र २५,६२८
चौकट
वयोगटानुसार लसीकरण
१८ ते ४४ ८,७१,४९३ ४१ टक्के
४५ ते ६० ६,९६,८१४ ३३ टक्के
६० वरील ५,६३,६३६ २६ टक्के
चौकट
महिला व पुरुषांचे लसीकरण
पुरुष १०,८७,५३४ ५१ टक्के
महिला १०,४४,०८३ ४९ टक्के
अन्य ०
चौकट
कंपनीनुसार लसीकरण
कोविशिल्ड १९,०७७,०५२ ९३ टक्के
कोवॅक्सिन १,५४,८९१ ७ टक्के
स्पुटनिक ०
चौकट
डोसनिहाय एकूण लसीकरण
पहिला १५,५३,४०३
दुसरा ५,७८,५४०
चौकट