शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुमठेच्या तरुणाचा खून कवलापूरच्या विमानतळावर!

By admin | Updated: March 3, 2017 23:45 IST

जेवणाचा बहाणा : डोक्यात लोखंडी पाईप घातली; मृतदेह मोटारीतून नेला; ग्रामीण पोलिसांचे कोल्हापूर जिल्ह्यात छापे

सांगली : कुमठे (ता. तासगाव) येथील सागर नामदेव गावडे (वय २७) या तरुणाचा कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर खून केल्याची कबुली अटकेत असलेल्या संशयितांनी दिली. ‘कवलापुरातील नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असून, तिथे जेवायला जाऊया’, असा बहाणा करुन सागरला विमानतळावर नेऊन, त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून त्याचा खून केला. या घटनेनंतर संशयितांनी त्याचा मृतदेह कोष्टी मळ्याजवळ नेऊन अपघाताचा बनाव केल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. गेल्या महिन्यात सांगली-कुमठे रस्त्यावर कोष्टी मळ्याजवळ सागरचा मृतदेह आढळला होता. त्याची दुचाकी रस्त्याकडेला पडली होती. तोही रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा अपघाती मृत्यू झाला असेल, अशी शक्यता होती. पण त्याची दुचाकी सुस्थितीत असल्याने अपघाताबद्दल पोलिसांना संशय आला. उत्तरीय तपासणीत सागरच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराचा घाव घातल्याचे स्पष्ट झाले. तेथून पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. सागरच्या नातेवाईकांनीही, त्याचा मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरु ठेवला. तब्बल पंधरा दिवसांच्या तपासानंतर सागरचा खून झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी उत्तम आनंदा गावडे (वय ३८, रा. रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व गणेश विठ्ठल बर्गे (३०) या दोघांना अटक केली होती. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. सागर व संशयित बर्गे हे दोघे उत्तम गावडे याच्याकडे रेंदाळ येथे कामाला होते. उत्तमचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी हे संबंध उघड झाले. त्याची चर्चाही झाली. हे संबंध उघड करण्यामागे सागरच कारणीभूत असल्याचे उत्तमला समजले. त्याच्यामुळे आपली बदनामी झाल्याचा उत्तमला राग होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने सागरची ‘गेम’ करण्याचे ठरविले. यासाठी त्याने बर्गेची मदत घेतली. बर्गेच्या सांगण्यावरुन उत्तमने सागरला कवलापूरच्या नियोजित विमानतळावर मारण्याचे ठरविले. त्यानुसार या दोघांनी सागरला, ‘कवलापूरला नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असून, तिथे जेवायला जायचे आहे’, असे सांगून त्याला माळाजवळ बोलावून घेतले. सागर दुचाकीवरुन तेथे आला. विमानतळमार्गे जाऊ, असे सांगून त्याला माळावर मध्यभागी नेले. उत्तम व बर्गे मोटारीत होते. सागर त्यांच्यामागे दुचाकीवरुन गेला होता. (प्रतिनिधी)