शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कुमुदाच्या अविनाश भोसलेला अटक !

By admin | Updated: April 6, 2017 21:25 IST

शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे कोट्यवधी रुपये थकितप्रकरणी चर्चेत असणाऱ्या बेळगाव येथील कुमुदा शुगर अँड अ‍ॅग्रो प्रोडक्टस लि., चे अध्यक्ष व मॅनेजिंंग डायरेक्टर अविनाश भोसले याला

आॅनलाईन लोकमतकऱ्हाड : शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे कोट्यवधी रुपये थकितप्रकरणी चर्चेत असणाऱ्या बेळगाव येथील कुमुदा शुगर अँड अ‍ॅग्रो प्रोडक्टस लि., चे अध्यक्ष व मॅनेजिंंग डायरेक्टर अविनाश भोसले याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. रयत सहकारी साखर कारखान्याशी केलेल्या करारपत्रात जाणून बुजून फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी कऱ्हाड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, दि. ९ एप्रिलपर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शेवाळेवाडी-म्हासोली येथील रयत सहकारी साखर कारखान्याचा व बेळगाव येथील कुमुदा शुगर्स यांच्यामध्ये १९ सप्टेंबर २०१३ मध्ये साखर आयुक्तांच्या समोर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याबाबतचा करार झाला होता. या कराराची नोंदणी कऱ्हाड सबरजिस्टर यांच्याकडे करणे बंधनकारक होते. असे असताना करारपत्रातील पाने बदलून बनावट कागदपत्रे बनवून दि. ५ आॅक्टोबर २०१३ मध्ये सबरजिस्टर बेळगाव (कर्नाटक) यांच्याकडे याची नोंदणी केली. अशा बनावट नोंदणीचा आधार घेऊन अविनाश भोसले याने महाराष्ट्र शासनाची स्टॅम्प ड्यूटी बुडवली आहे. याप्रकरणी कारखान्याच्या वतीने २७ आॅगस्ट २०१५ रोजी कऱ्हाड न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या दाव्यात १५६/क प्रमाणे चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते. गेली दोन वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता.बार्शी पोलिसांनी थकित ऊसबिलप्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी अविनाश भोसले याला अटक केली होती. कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी बार्शी न्यायालयाकडून त्याला ताब्यात घेऊन कऱ्हाड न्यायालयात हजर केले असता अविनाश भोसले याला दि. ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अविनाश भोसले व त्याच्या कुमुदा शुगर्स कंपनीने रयत-कुमुदा कारखान्याकडे गळीत हंगाम २०१४-१५ मध्ये गाळपास आलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलापोटी ९ कोटी ९५ लाखांचे थकित देणे बाकी असून, याप्रकरणी कऱ्हाड न्यायालयात साखर आयुक्त, पुणे यांच्या आदेशाने प्रादेशिक सहसंचालकांनी अविनाश भोसलेसह ९ संचालकांवर दावा दाखल केला आहे. याप्रकरणीही तो पोलिसांना हवा होता. याबरोबर कऱ्हाड ग्रामीण पोलिसांकडे शेतकरी व वाहतूकदारांच्या आर्थिक फसवणुकीचे अनेक तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. त्याच्या चौकशीसाठीही अविनाश भोसले पोलिसांना हवा होता. याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकरी व वाहतूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन कऱ्हाड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)