शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा कारखान्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : रेठरे बुद्रुक (ता.कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : रेठरे बुद्रुक (ता.कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेर जीएसटी कर प्रणाली नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही केली. याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला ‘सर्टिफिकेट ऑफ अ‍ॅप्रिसिएशन प्रमाणपत्र' प्रदान करून सन्मान केला आहे.

डॉ. सुरेश भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याकडून जीएसटी कराचा नियमित भरणा केला जातो. केंद्रिय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष एम. अजितकुमार यांनी हे प्रमाणपत्र प्रदान केले असल्याची माहिती कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली.

केंद्र शासनाने जुलै २०१७ मध्ये जीएसटी कर प्रणाली लागू केली. तेव्हापासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अत्यंत तत्परतेने व नियमित जीएसटी रक्कम तसेच विवरण पत्रके वेळेत भरणा करून केंद्र शासनास सहकार्य केले आहे. त्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला ‘सर्टिफिकेट ऑफ अ‍ॅप्रिसिएशन प्रमाणपत्र’ प्रदान करून सन्मान केला आहे. नियमित जीएसटी भरणा करण्याकामी जीएसटी कन्सल्टंट जी. एस. थोरात, अ‍ॅड. व्ही. बी. गायकवाड, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, फायनान्स मॅनेजर सी. एन. मिसाळ व कारखान्याच्या जीएसटी विभागाने विशेष परिश्रम घेतले.

चौकट

राज्याकडूनही झालेय अभिनंदन

सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने राज्य शासनाकडे व्हॅट करापोटी ७७ कोटी १६ लाख रुपये आणि जीएसटीपोटी ९ कोटी ५ लाख असा एकूण ८६ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. सातारा जिल्ह्यात इतक्या मोठ्या रकमेचा महसूल कर कृष्णा कारखान्याने शासनाकडे भरल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कृष्णा कारखान्याचे विशेष अभिनंदन केले होते.