शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

दुधोंडीमध्ये कृष्णा कालव्याचे काम अर्धवट

By admin | Updated: December 14, 2014 23:49 IST

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : झाडाझुडपांच्या साम्राज्यामुळे दुरवस्था

दुधोंडी : पलूस तालुक्यातील दुधोंडी ते पुणदीदरम्यान असलेल्या कृष्णा पोटकालव्याची अर्धवट कामामुळे दुरवस्था झाली आहे. झाडाझुडपांमुळे पोटकालव्याची सध्या इतकी दुरवस्था झाली आहे की, पाणी पुढे न सरकता पात्राबाहेर पडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. या पोटकालव्याच्या पाण्यावर ३००-४०० एकर जमीन ओलिताखाली येते; मात्र सध्याची पोटकालव्याची स्थिती पाहता, सर्व शेती धोक्याची बनत आहे. पोटकालव्याचे काम २००९ मध्ये सुरू झाले व २०११ ला बंद झाले. यावेळी कालव्यामधील झाडेझुडपे काढून कालव्याची खुदाई करून त्यात मुरूम भरून सपाटीकरण करण्यात आले व दोन्ही बाजूला रस्ते करण्यात आले. मात्र रस्त्याचे काम पक्के न झाल्याने वाहतूक करता येत नव्हती. फक्त पाऊलवाट पडली, पावसाळ्यात तीही बंद झाली. झाडाझुडपांमुळे रस्ता गायब झाला आहे. सध्या कालव्यामध्ये झाडेझुडपे व काटेरी वनस्पती वाढल्याने पाणी प्रवाहास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रसंगी आजूबाजूची शेती धोक्यात आली आहे. या कालव्यावर ३००-३५० एकर शेती अवलंबून आहे. हा कृष्णा कालवा बारमाही करण्यासाठी व कायमस्वरूपी ३ टीएमसी पाणी पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाविरुध्द उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर तीन टीएमसी पाणी मिळविण्यात यश मिळविले. मात्र कालव्याच्या दुरवस्थेमुळे या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. तरी संबंधित खात्याने या कालव्याच्या दुरवस्थेची दखल घेऊन कालव्यामधील झाडे-झुडपे काढून काँक्रिटीकरण करावे व रस्त्याचे काम पक्के करून रस्ता रहदारीयुक्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)