शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या प्लास्टिक कचऱ्यामुळे कचरावेचक महिलांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:22 IST

कचरावेचक महिलांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अवनि संस्थेच्या सदस्यांनी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ---------- लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...

कचरावेचक महिलांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अवनि संस्थेच्या सदस्यांनी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

----------

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना व लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या कचरावेचक महिलांना रोजगार देण्याची मागणी अवनि संस्थेने केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सांगली व मिरज शहरातील कचरावेचक महिलांनी आंदोलनात भाग घेतला.

अवनिचे जिल्हा समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रात ५०४ महिला कचरा गोळा करून पुनर्वापरासाठी उपयोगात आणतात. प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या त्यांच्या कामामुळे सुसह्य झाली आहे. पण कोरोना व लॉकडाऊन काळात त्यांचे हाल सुरु आहेत. कोविड विषाणूचा संसर्ग झालेला प्लास्टिक कचरा संकलित करणे धोक्याचे ठरत आहे. लॉकडाऊनमुळेही कचरा संकलनासाठी बाहेर पडता आलेले नाही. त्यामुळे उपासमार सुरु आहे. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने रोजगार उपलब्ध करुन द्यावा.

संघटनेने मागणी केली आहे की, प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व कचरावेचक महिलांचे सर्वेक्षण करावे, ओळखपत्रे द्यावीत, त्यांच्या बचत गटांना कचरा वर्गीकरणाचे काम द्यावे, वीजबिल माफ करावे, रोजगार द्यावा अथवा बेरोजगार भत्ता मिळावा, मनरेगा योजना शहरी भागातही लागू करावी, वारांगनांप्रमाणे कचरावेचक महिलांनाही मुख्यमंत्री निधीतून पाच हजारांची मदत द्यावी, राज्यातील कचरावेचक महिलांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.

आंदोलनात सोनाली कांबळे, स्मिता गायकवाड, हिना गोसावी, रुकैय्या पटेल, राधिका झांबरे आदींनी भाग घेतला.

चौकट

१० जानेवारीपासून उपोषण

अवनि संस्थेने सांगितले की, कचरावेचक महिलांच्या मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय झाला नाही, तर १० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले जाईल.

-----------