शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मालगावच्या तरुणाचा अपहरण करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:22 IST

मिरज : मालगाव येथील सार्जन शहाजी काळे (वय २५) या तरुणाचा काठ्यांनी बेदम मारहाण करून खून करण्यात आला. रविवारी ...

मिरज : मालगाव येथील सार्जन शहाजी काळे (वय २५) या तरुणाचा काठ्यांनी बेदम मारहाण करून खून करण्यात आला. रविवारी सकाळी सिध्देवाडी येथे सार्जन याचा मृतदेह सापडला. बनावट सोने विक्री व फसवणूक प्रकरणातून सहा ते सातजणांनी मोटारीतून अपहरण करून सार्जन काळे याचा खून केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालगाव येथील पारधी वस्तीवर राहणाऱ्या सार्जन काळे याचे शनिवारी सायंकाळी मोटारीतून आलेल्या सहा ते सातजणांनी अपहरण केले. कुपवाड येथील दिनेश नामक व्यक्तीने सार्जन याचे वडील शहाजी व भाऊ अमरीश यांच्या मोबाईलवर संपर्क साधून बनावट सोने देऊन घेतलेले ५० हजार रुपये व दोन अंगठ्या परत करून सार्जन यास घेऊन जा, असे सांगितले. शहाजी काळे यांनी पारधी मुक्ती आंदोलनाचे सनातन भोसले यांना हा प्रकार सांगितला. भोसले यांनी अपहरणकर्त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर सार्जन हा ताब्यातून पळाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी रात्री ग्रामीण पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. रविवारी सकाळी सिध्देवाडी येथे हनुमान मंदिराजवळ सार्जन याचा मृतदेह आढळला. त्याच्या पाठीवर, छातीवर, पायावर काठ्यांनी मारहाणीचे वळ होते. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत सार्जन याच्या बरगड्या मोडल्याचे व मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सार्जन याचा खून करणाºयांना अटक करण्याच्या मागणीसाठी काळे कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.स्वस्त सोन्याचे आमिषमालगाव व खंडेराजुरी परिसरात स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने कुपवाड येथील काहीजणांच्या फसवणुकीचा प्रकार घडला होता. या घटनेशी संबंध नसताना फसवणुकीची रक्कम वसूल करण्यासाठी सार्जन यास बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची तक्रार कुटुंबियांनी केली.