शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पलूस तालुक्यात खरीप पिके धोक्यात

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

दुबार पेरणीचे संकट : ३५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतातूर

किरण सावंत - किर्लोस्करवाडी -पलूस तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी तालुक्यातील जवळजवळ ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर उर्वरित ३५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. पेरणी झालेली पिके पाण्याअभावी वाळू लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.तालुक्यात मान्सूनपूर्व तसेच जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात झालेला मान्सूनच्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली होती. तालुक्यातील १० हजार ५०० हेक्टर खरीप पेरणी क्षेत्रावपैकी सुमारे साडेसहा हजार क्षेत्रावर सोयाबीन, ज्वारी, भुईमूग, मूग, उडीद यांची पेरणी झाली. सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने अनेक ठिकाणी उगवणही चांगली झाली. मात्र पावसाने दडी मारली. गेल्या १० ते १२ दिवसांपासून तापमानातही कमालीची वाढ झाली. उन्हामुळे उगवून आलेली पिकेही आता दुपार धरू लागली आहेत. आधीच पावसाने मारलेली दडी आणि दुपार धरू लागलेली पिके यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील चार हजार हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीपासून वंचित आहे. २० जुलैपर्यंत खरीप पेरण्या होणे अपेक्षित आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने उर्वरित क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या असून, २० जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास पेरणी हंगाम वाया जाणार असून दुबार पेरणी करणेही कठीण होणार आहे. बळीराजासमोर सलग दुसऱ्यावर्षीही अस्मानी संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीही मान्सूनने हुलकावणी दिली होती. मात्र यावेळी शेतकरी जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात सलग तीन ते चार दिवस पडलेल्या पावसावर पेरणी करून अडचणीत आला आहे.तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावात पाणी पुरेसे आहे. मात्र इतर गावांत पाण्याची टंचाई आहे. पाणी पुरवठा योजना आहेत. परंतु खरीप पिकांना पाणी पुरविणाऱ्या संस्थांचे पाणी दर परवडणारे नाहीत. त्यामुळे हे पाणी खरीप पिकांना देण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत. पण पेरणी झालेल्या सोयाबीन, भुुईमूग, ज्वारी, उडीद आदी पिकांच्या वाढीस पूरक वातावरण नसल्याने वाढ समाधानकारक नाही. द्राक्षबागेचे क्षेत्र तालुक्यात मोठे आहे. आंधळी, मोराळे, बांबवडे येथील द्राक्षबागांना पाण्याची आवश्यकता आहे.