शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

खरसुंडी देवस्थान विकासाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 18, 2017 23:17 IST

भाविकांत नाराजी : नाथनगरीत सुरक्षेसह सुलभ शौचालय आणि स्वच्छतेचा अभाव; समन्वयाची गरज

विक्रम भिसे ल्ल खरसुंडीतीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) नगरीत येणाऱ्या भाविक-भक्तांना मूलभूत सेवा, पिण्याचे स्वच्छ पाणी, सुलभ शौचालय अशा अनेक प्रश्नांचा अभाव आहे.तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे श्री सिध्दनाथाचे हेमाडपंथी मंदिर आहे. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत असलेल्या या मंदिरामध्ये वर्षभर अनेक उत्सव, कार्यक्रम, वर्षाच्या बारा पौर्णिमेला कार्यक्रम आणि वर्षातून दोनदा प्रसिध्द खिलार जनावरांच्या यात्रा व सासनकाठी, गुलाल-खोबरे उधळणीची चैत्री यात्रा भरत असते. यानिमित्ताने वर्षभर भाविक-भक्तांची व यात्रेकरूंची लाखोंच्या संख्येने वर्दळ असते. यात्रेदरम्यान ग्रामपंचायत, देवस्थान, बाजार समिती आणि प्रशासनाची नेहमीच तारांबळ उडत असते. खरसुंडी येथे चैत्री यात्रेस चार ते पाच लाख भाविक दाखल होत असतात. त्यांना पुरेशी सेवा उपलब्ध करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. मात्र श्री नाथावरील श्रध्देमुळे भाविकांतील महती कुठेही कमी झाल्याचे दिसून येत नाही. दिवसेंदिवस श्रीनाथाचे महात्म्य वाढत असून, यात्रेमध्ये भाविकांची व यात्रेकरूंची संख्या वाढतच आहे. त्यामानाने पुरेशी सेवा उपलब्ध करून देण्यास सर्वांचे प्रयत्न तोकडे पडतात. देशाच्या काना-कोपऱ्यात प्रसिध्द असलेल्या चैत्री व पौषी यात्रेसाठी अनेक राज्यांतून श्रध्दाळू आणि व्यापारीवर्ग श्रीनाथ नगरीत येतात. मात्र गावातील या प्रसिध्द यात्रेचे नियोजन करण्यासाठी आणि जबाबदारी पेलण्यासाठी यात्रा समिती बनविणे गरजेचे आहे. प्रत्येकवर्षी यात्रेपूर्वी काही दिवस आधी प्रांताधिकऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनातील सर्व विभाग, देवस्थान, ग्रामपंचायत, पंचायत, बाजार समिती, मानकरी, ग्रामस्थांची नियोजन आढावा बैठक घेतली जाते. संबंधित सर्व विभागातील अधिकारी, पदाधिकारी नियोजन सांगतात. परंतु यात्रेचा ताण इतका मोठा असतो की, प्रत्येक विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. अनेकवेळा देवस्थान, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधला जात नसल्याने यात्रेकरूंना आणि भाविक-भक्तांना पुरेशी सेवा उपलब्ध न झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा अनुचित प्रकार घडून संकटाला सामोरे जावे लागते. त्यावेळी प्रशासनालाही पळापळ करावी लागते. या नगरीचा इतर देवस्थानच्या मानाने सर्वांगीण विकास साधला जात नाही. यासाठी आमदार, खासदार, प्रशासन यांच्या इच्छाशक्तीची गरज असून, इतर देवस्थानांप्रमाणे खरसुंडी श्री सिध्दनाथ देवस्थानचा विकास साधला जावा, यासाठी खरसुंडी श्रीनाथ नगरीत प्रशासनाच्या पुढाकाराने देवस्थान, ग्रामस्थ, मानकरी आणि बाजार समिती यांची संयुक्त यात्रा समिती स्थापन केली पाहिजे. देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाकडे विकास आराखड्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भाविकांची मागणी आहे. या भागातील भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य मंत्रिमंडळातील चांगल्या संबंधाचा उपयोग या देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी करावा, अशी जनतेतून मागणी आहे. या भागातील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख या तरुण नेत्यांनी श्रीनाथ देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.