शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रस-राष्ट्रवादीला खोत यांचा नवा धक्का !

By admin | Updated: May 11, 2017 23:10 IST

काँगे्रस-राष्ट्रवादीला खोत यांचा नवा धक्का !

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘शासन तृणधान्य व कडधान्ये नियमनमुक्त करणार आहे. मागे जशी विरोधकांनी ओरड केली तशीच ते या निर्णयानंतरही करतील याची मला खात्री आहे. विरोधकांना शेतकऱ्यांचा नाही तर व्यापाऱ्यांचा कळवळा आहे,’ अशी टीका खोत यांनी केली.‘कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करायला हवे, या हेतूने सिमेंट काँक्रीटचे बंधारे बांधण्याचे काम आमचा विभाग करत आहे, ती कामे आता कृषी विभाग करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील माझा हा निर्णय मान्य केला आहे,’ असे स्पष्टीकरण राज्याचे कृषी व पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत केले.गुरुवारी मंत्री खोत स्वत: जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत भोसरे, ता. खटाव येथे श्रमदान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दृष्टीने शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मंत्री खोत यांनी येथील विश्रामगृहावर बुधवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली.मंत्री खोत यांनी विरोधकांवरही टीकास्त्र झोडले. माझ्याकडे पणन खाते आल्यानंतर भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतकरी विक्री व्यवस्थेत पुढे आला. बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या लुटण्याचे अड्डे आहेत. माझ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करणारी यंत्रणा अडचणीत आली. आज जे शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचा आव आणत आहेत. तीच मंडळी आडतदार, व्यापारी यांना सोबत घेऊन सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. १९६३ पूर्वी कुठे बाजार समित्या होत्या. तरी देखील खाल्यांच्या माध्यमातून शेतकरी आपला माल विकत होते. शेतकऱ्यांना मालाच्या विक्रीचे स्वातंत्र्य होते. आता तीच व्यवस्था शासन आणणार आहे.रोहिणी नक्षत्रात शासनातर्फे उन्नत शेती अभियान राबविले जाणार आहे. कोकणातून पेरणी दौरा सुरू करणार आहे. राज्यात सर्वत्र जाऊन पेरणी करणार आहे. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत पेरणी करतील. हवामान आधारित स्वयंचलित केंद्र प्रत्येक महसूलच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. गारपीट वादळ याची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळू शकणार आहे.शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी इथून पुढचा काळ काम करणार आहे. साखळी वेअर हाउस उभारून शेतकऱ्यांच्या मालाला दर वाढेपर्यंत साठवणुकीची व्यवस्था करणार आहे. शेतमालाला कर लावण्याचे मतशेतमालाला कर लावावा या मताशी आपण सहमत असल्याचे मंत्री खोत म्हणाले. कर लावल्याशिवाय या व्यवसायातील नफा-तोटा पुढे येणार नाही. शेती हा खात्रीने तोट्यातील व्यवसाय आहे, त्यामुळे तोट्यातील व्यवसायाला कर लावता येणार नाही. हे स्पष्टपणे पुढे येईल, असेही खोत यांनी सांगितले.रघुनाथदादांवर टीका करणे टाळलेशेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता खोत यांनी कोणतीही टीका करणे टाळले. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आलो आहोत मार्ग वेगळे असले तरी सर्वांचा हेतू एकच आहे. रघुनाथदादा, खासदार राजू शेट्टी, शंकर गोडसे यांनी शेतकरी चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य दिल्याचे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.