शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भ्रूणहत्येप्रकरणी चौकशीत खिद्रापुरे दोषी

By admin | Updated: April 12, 2017 00:22 IST

वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची शिफारस; समितीकडून आठवड्यात अहवाल

मिरज : राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांड प्रकरणात डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला विशेष समितीने केलेल्या चौकशीत दोषी ठरविण्यात आले आहे. अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. खिद्रापुरेची वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची शिफारस ही समिती आरोग्य विभागाकडे करणार असल्याची माहिती मंगळवारी मिळाली. डॉ. खिद्रापुरे याच्या चौकशीसाठी नियुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची दुसरी बैठक मंगळवारी मिरज शासकीय महाविद्यालयात पार पडली. ही समिती एका आठवड्यात आरोग्य विभागाला चौकशी अहवाल देणार असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले.मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याचा भ्रूणकत्तलखाना उघडकीस आला. डॉ. खिद्रापुरे याने म्हैसाळ परिसरात पुरलेले १९ भ्रूण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या भ्रूणहत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.डॉ. खिद्रापुरे याने केलेल्या अवैध कृत्यांच्या चौकशीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीची पहिली बैठक पंधरवड्यापूर्वी झाली होती. समितीने पहिल्या बैठकीनंतर डॉ. खिद्रापुरे याच्या म्हैसाळ येथील रुग्णालयाची पाहणी केली होती. मंगळवारी डॉ. सापळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या दुसऱ्या बैठकीस तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत खिद्रापुरे याचा अवैध वैद्यकीय व्यवसाय व आरोग्य विभागाने दिलेल्या चार मुद्द्यांवर चर्चा झाली. समितीच्या अध्यक्षा डॉ. सापळे यांनी चौकशी समितीच्या निष्कर्षाबाबत अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, चौकशीत डॉ. खिद्रापुरे दोषी ठरला असून, त्याच्याविरुद्ध आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय गर्भपात कायदा, मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक अ‍ॅक्टअंतर्गत स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे. शिवाय वैद्यकीय व्यावसायिक म्हणून त्याची नोंदणी रद्द करण्याची शिफारसही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)