लोकमत न्यूज नेटवर्क
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील अशा सेविकांनी कोरोना संकटात दिलेल्या योगदानाची दखल घेत पुणे येथील इकोनेट संस्थेच्या वतीने त्यांना मदत करण्यात आली.
आरोग्य साहित्य, कोरोना किटचे वाटप करण्यात आले. सरपंच लता पुजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिमन्यू कदम, डॉ. दिनेश घोलप, इकोनेट संस्थेच्या रीटा माने, आशा सेविका, सिस्टर, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
रीटा माने म्हणाल्या की, खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत अनेक गावे, वाड्यावस्त्या आहेत. आशा सेविका आणि येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव व डॉ. अभिमन्यू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या काळात चांगले काम केले. योग्य ती आरोग्य सेवा दिली. त्यामुळेच खरसुंडी गाव आज कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून इकोनेट संस्थेच्या वतीने आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.