शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

खरसुंडीच्या तरुणाचा लेह-लडाखपर्यंतचा थरारक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:31 IST

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी ते जगातील सर्वात उंचीचा मोटारसायकलने जाता येणारा लेह-लडाख येथील खारदुंगला पॉर्इंट...तब्बल ७ हजार किलोमीटरचे अंतर आणि दुचाकीवरून पूर्ण केलेली ही आव्हानात्मक सफर... हा प्रवास खरसुंडीच्या विक्रम दिनकर भोसले या तरुणाने केला. ‘लॉँग राईड’ची आवड असलेल्या विक्रमने एकट्यानेच प्रवास सुरू केला; पण ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी ते जगातील सर्वात उंचीचा मोटारसायकलने जाता येणारा लेह-लडाख येथील खारदुंगला पॉर्इंट...तब्बल ७ हजार किलोमीटरचे अंतर आणि दुचाकीवरून पूर्ण केलेली ही आव्हानात्मक सफर... हा प्रवास खरसुंडीच्या विक्रम दिनकर भोसले या तरुणाने केला. ‘लॉँग राईड’ची आवड असलेल्या विक्रमने एकट्यानेच प्रवास सुरू केला; पण नंतर फेसबुकवरील ‘द हिमालयीन ट्रॅव्हल गु्रप’ आणि ‘लेह लदाख रोड ट्रीप-२0१८’ ग्रुपवरून भेटलेला मित्र पुढे सोबती झाला. वातावरणातील बदल आणि आलेल्या आव्हानांना तोंड देत विक्रमने हा प्रवास पूर्ण केला.आजची तरुणाई समाजमाध्यमांमध्ये पुरती गुंतली असली तरी, असेही काही तरुण आहेत की ज्यांना काही तरी आव्हानात्मक ‘लाईफ’ जगायचे असते. अशातलाच एक म्हणजे विक्रम भोसले. खरसुंडीतील हा तरुण कृषी पदवीधर. मात्र, दुचाकीवरून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याची त्याला आवड. यातूनच त्याने राज्याच्या बाहेर आपल्या दुचाकीवरून प्रवास करण्याचा निश्चय केला, परंतु त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. यु-ट्युबवरील काही ट्रेकर्स आणि दुचाकीस्वारांची प्रवास वर्णने पाहून त्याने एकट्यानेच खरसुंडी ते लेह-लडाखपर्यंत जाण्याचा निर्धार केला. सोबत कोणीही नसताना त्याने घेतलेला हा निर्णय धाडसाचाच होता. त्याने एकट्याने प्रवास सुरू केलाही. पुण्यात गेल्यानंतर ‘द हिमालयीन माऊंटन’ या फेसबुक ग्रुपवर त्याने ‘पोस्ट’ टाकल्यानंतर त्याला रोहित वरगडे हा पुण्यातून त्याच्याबरोबर प्रवासात सामील झाला.खरसुंडी, पुणे, नाशिक, धुळे, रतलाम, चितोडगढ, रेवाडी, रोहंतक, चंदीगढ, अमृतसर, पठाणकोठ, सांबा, उधमपूर, श्रीनगर, कारगिल, लेह आणि १८३८० फूट उंचीवरील लडाखपर्यंत त्याने प्रवास केला. जगातील सर्वात जास्त उंचीच्या या जागेवर कुणालाही १० मिनिटाच्यावर थांबता येत नाही. कारण याठिकाणी आॅक्सिजनचे प्रमाण खूपच कमी आहे. १० मिनिटापेक्षा जास्त थांबल्यास श्वासास त्रास, उलटी, चक्कर येण्याचा धोका असल्याने लगेचच खाली उतरल्याचे विक्रम सांगतो.तेथून खाली आल्यानंतर तो ‘हुंदर’ या हिमालयातील वाळवंटात पोहोचला. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे दोन पाठ असलेले उंट केवळ या भागातच पाहायला मिळतात. पेगॉँग लेक, तांगलागला या जगातील दोन नंबरच्या उंचीच्या ठिकाणावरही त्याने प्रवेश केला. त्याने एकूण ६ दिवस लेह-लडाख परिसरात प्रवास केला. कारगिल येथील वॉर मेमोरियलला भेट दिल्यावर अभिमान वाटल्याचे विक्रमने सांगितले.१२ वेळा आॅईल बदलीप्रवास सुरू केल्यापासून घरी परत येईपर्यंत विक्रमने त्याच्या दुचाकीची बारावेळा आॅईल बदली केली. श्रीनगर, लेह, लडाख परिसरात बर्फाचे प्रमाण अधिक असल्याने आॅईल घट्ट होत होते, त्यामुळे आॅईल बदली केली. या प्रवासात त्याला १६ हजार रुपयांचे पेट्रोल लागले.जम्मू काश्मीरमध्ये सहकार्यविक्रमने सांगितले की, इथून आपणाला जम्मू काश्मीरमध्ये स्फोटक परिस्थिती असल्याचे जाणवते. मात्र, तशी स्थिती नसून, तेथील नागरिक पर्यटकांना देव समजतात. तेथील प्रवासात आणि मुक्कामात तेथील नागरिकांनी खूपच सहकार्य केले.ते अक्षरश: रडलेखारदुंगला हा पॉर्इंट जवळ आला असतानाच काही अडचणी आल्या. रस्त्यावर पूर्ण बर्फ असल्याने वाहने घसरत होती. रस्ता अत्यंत निमुळता, लागूनच असलेली दरी त्यामुळे थोडाजरी तोल गेला तरी धोका आणि त्यात रस्त्यावरील बर्फ कायम होता. परिस्थिती जैसे थे राहिल्याने दक्षिण भारतातून आलेले तरुण अक्षरश: रडायला लागल्याचे विक्रमने सांगितले; पण यावेळी भारतीय जवानांनी आम्हाला धीर दिला व काळजी करू नका, असे सांगत मदत केली. त्यामुळेच प्रवास पूर्ण झाल्याचे त्याने आवर्जून सांगितले.