शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबाचीवाडीत शेतमजूर महिलेचा निर्घृण खून

By admin | Updated: September 5, 2016 00:18 IST

कोयत्याने हल्ला : शिर धडावेगळे केले

भिलवडी : खंडोबाचीवाडी (ता. पलूस) येथे वर्षा विश्वास शिंदे (वय ४५) या शेतमजूर महिलेचा अज्ञातांनी कोयत्याने गळा चिरून शिर धडावेगळे करून निर्घृण खून केला. याबाबत तिचे पती विश्वास अण्णा शिंदे (वय ६०) यांनी भिलवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. भिलवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वर्षा शिंदे या पतीसह खंडोबाचीवाडी येथील शिंदे मळ्यात राहतात. रविवारी सकाळी ७ वाजता घरातील स्वयंपाक आटोपून त्या जुन्या शिंदे मळ्यामधील एका शेतात शेतमजुरीसाठी गेल्या होत्या. काम संपल्यानंतर त्या शेजारील शेतात चवळीच्या शेंगा तोडण्यासाठी जाणार होत्या. दुपारी कामाच्या सुटीनंतरही त्या घरी परतल्या नसल्याने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पती विश्वास शिंदे त्यांना उशीर का झाला, हे पाहण्यासाठी शेतात गेले. यावेळी त्यांना शेतात वर्षा यांचा मृतदेह शिर धडावेगळे असलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकारामुळे विश्वास शिंदे घाबरून गेले. त्यांनी तातडीने भिलवडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. भिलवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने गळा चिरून शिर धडावेगळे के ल्याचे दिसून आले. रात्री उशिरा तासगावचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी सांगलीहून पाचारण केलेल्या श्वानपथकामार्फत हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला महिलेचा खून झाल्याने भिलवडी परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)