शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

खंडेराजुरी आरोग्य केंद्राचे घाईगडबडीत उदघाटन!

By admin | Updated: August 11, 2014 00:16 IST

सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार : कार्यक्रमाला पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती

मालगाव : खंडेराजुरी (ता. मिरज) येथे पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याहस्ते घाईगडबडीत पार पडलेल्या आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमावर ग्रामपंचायतीमधील नाराज सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला. सरपंच व उपसरपंचांच्या उपस्थितीशिवाय हा कार्यक्रम पार पडला. खंडेराजुरी येथे ७० लाख रुपये खर्च करून नव्याने आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे. बांधकामाच्या दर्जाविषयी गाजावाजा झालेले हे आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत होते. प्रशासकीय पातळीवर पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याहस्ते उदघाटनाचे नियोजन करण्यात आले. या नियोजनामुळे गोंधळ निर्माण झाला. आरोग्य केंद्राच्या नियोजनाने उदघाटन करण्याचे ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे धोरण होते. तत्पूर्वीच पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याहस्ते आरोग्य केंद्राचे उदघाटन करण्यात आले. घाईगडबडीत उदघाटनाचा घाट घातल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर होता. अशात कार्यक्रमादिवशीच निमंत्रण दिले गेल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजप युतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह नेत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेऊन बहिष्कार घातला. पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंचांना कार्यक्रमास उपस्थित रहाण्याबाबत विनंती केली; मात्र संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने ही विनंती नाकारली. हा कार्यक्रम प्रशासकीय असल्याचे भासविले जात असले तरी या कार्यक्रमामागे काँग्रेस पक्षाची भूमिका श्रेयवादाची होती. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ श्रेयवादासाठीच आम्हाला जाणीवपूर्वक डावलून हा कार्यक्रम घेतला आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार घालावा लागल्याचे राष्ट्रवादी व भाजप युतीच्या नेते व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या उदघाटनाच्या कार्यक्रमावरून गावात चांगलेच राजकीय वादळ उठले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुसऱ्यांदा पुन्हा उदघाटनाचा कार्यक्रम घेण्याच्या हालचाली राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहेत. (वार्ताहर)रंगले मानापमान नाट्य...आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात फारसे महत्त्व न दिल्यामुळे काँग्रेसचे पंचायत समितीचे सदस्य व माजी सभापती आबासाहेब चव्हाण हेही नाराज झाले आहेत. त्यांनी या नाराजीतून ग्रामपंचायत परिसरात पाच लाख रुपये खर्च करुन बसविण्यात येणाऱ्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे उदघाटन ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादी व भाजपच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन केले. या प्रकाराने खंडेराजुरीच्या काँग्रेस गटात चांगलेच मानापमानाचे नाट्य रंगले आहे.