शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर तालुक्यात ८६ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

विटा : खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ३५० पैकी १२८ ...

विटा : खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ३५० पैकी १२८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तांदळगाव आणि भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच पारे ग्रामपंचायतीचे ७ आणि शेडगेवाडी ग्रामपंचायतीचा १ असे आठ सदस्यही बिनविरोध झाल्याने उर्वरित ८६ जागांसाठी २०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीत दुरंगी, तर माहुली गावात तिरंगी लढत होत आहे. खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या ग्रामपंचायतींच्या ४२ प्रभागातील १०८ जागांसाठी ३५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी त्यातील १२८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तांदळगाव आणि भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. पारे ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ४ जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत.

माहुली ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात असल्याने येथे तिरंगी लढत होत आहे, तर रेणावी येथील ९ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तालुक्यातील नागेवाडी, मंगरूळ, खंबाळे (भा.), भिकवडी बुद्रुक, देविखिंडी, पोसेवाडी, शेडगेवाडी व मेंगाणवाडी येथे दुरंगी लढत होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी तालुक्यातील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

चौकट

पारे, तांदळगाव ग्रामपंचायतींवर भगवा

खानापूर तालुक्यातील पारे ग्रामपंचायतीत सोमवारी आ. अनिल बाबर समर्थक गटाचे ७ सदस्य बिनविरोध झाले. त्यामुळे सोमवारी या सात नूतन सदस्यांचा आ. बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह पारे गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. पारे ग्रामपंचायतीच्या उर्वरित ४ जागाही मोठ्या फरकाने जिंकण्याचा मानस यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तसेच तांदळगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

फोटो - ०४०१२०२१-विटा-ग्रामपंचायत निवडणूक

ओळ :

पारे ग्रामपंचायतीत आ. अनिल बाबर गटाचे सात सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर आ. बाबर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.