घानवड (ता. खानापूर) येथे पंचवीस-पंधरा योजनेतून पूर्ण करण्यात येणाऱ्या रस्ता कामाचा प्रारंभ माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रशांत भोसले, कृष्णा रावताळे, मनोहर रावताळे, दिलीप कदम, शिवाजी सावंत उपस्थित होते.
सुहास बाबर म्हणाले, विधानसभेच्या मागील दोन निवडणुकीत आ. अनिलभाऊ बाबर यांनी या मतदारसंघाच्या विकासाचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द जनतेला दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यात यश आले आहे. त्यामुळे यापुढील काळातही खानापूर मतदारसंघाच्या विकासातून आदर्श मतदारसंघ करण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी उध्दव रावताळे, नारायण सावंत, बबन रावताळे, दशरथ भोसले, संतोष सावंत, चंद्रकांत जाधव, बापूराव चव्हाण, प्रभाकर सावंत, रामचंद्र रावताळे, भिवाजी कदम, पांडुरंग रावताळे, शिवाजी रावताळे, अशोक सावंत, हणमंत रावताळे, नवनाथ सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १५०२२०२१-विटा-घानवड : घानवड (ता. खानापूर) येथे रस्ता कामाचा प्रारंभ जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याहस्ते झाला. यावेळी प्रशांत भोसले, कृष्णा रावताळे, दिलीप कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.