शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात घुमली खानापूरच्या वाघाची डरकाळी

By admin | Updated: March 21, 2017 23:41 IST

शिवसेनेला उपाध्यक्षपद : सुहास बाबर यांच्या निवडीने जल्लोष; दुष्काळी तालुक्याला न्याय

दिलीप मोहिते ल्ल विटाजिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास बाबर यांची निवड झाल्याने, खानापूरच्या वाघाची डरकाळी संपूर्ण जिल्ह्यात घुमली आहे. निवडीचे वृत्त तालुक्यात धडकताच मंगळवारी विटा शहरासह खानापूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला. बाबर यांच्या निवडीने पहिल्यांदाच दुष्काळी खानापूर तालुक्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खानापूर तालुक्यातील सर्व तीनही जिल्हा परिषद जागांवर आ. अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भगवा फडकवला. पक्षीय बलाबल पाहता, शिवसेना किंगमेकरची भूमिका पार पाडणार, यावर शिक्कामोर्तब झाले होते. आ. बाबर यांनीही जिल्हा परिषदेत शिवसेना निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे भाकीत निवडणुकीपूर्वीच केले होते, ते तंतोतंत खरे ठरले. सत्ता स्थापनेत भाजप व विरोधी पक्षांना शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यामुळे आ. बाबर यांच्या तीन सदस्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मंगळवारी उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे सुहास बाबर यांनी अर्ज दाखल केल्याचे समजताच खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते सांगलीच्या दिशेने रवाना झाले. दुपारी तीन वाजता उपाध्यक्षपदी बाबर यांची निवड झाल्याचे समजताच विटा शहरासह तालुक्यात प्रचंड जल्लोष करण्यात आला. बाबर विट्यात दाखल होताच चौंडेश्वरी चौकातील शिवसेना भवन कार्यालयाजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली. आ. अनिल बाबर, सुहास बाबर यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागात साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (वार्ताहर)