शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

खाडेंना टोचू लागले कमळाचे काटे!

By admin | Updated: December 5, 2014 23:34 IST

भाजपमध्ये वाद : मंत्रिपदाची कापाकापी जोमात; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; उलट-सुलट चर्चा

सदानंद औंधे- मिरज -राज्य मंत्रिमंडळाच्या आज (शुक्रवारी) झालेल्या विस्तारात मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना स्थान मिळाले नसल्याने समर्थक-कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जिल्ह्यात मंत्रिपदावरून भाजप नेत्यांमध्ये दोन गट पडल्याने मंत्रिपदावर वर्णी लावण्यासाठी एकमेकांचे पत्ते कट कापण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याने जिल्ह्यातील भाजपचे मंत्री अद्याप निश्चित झालेले नाहीत. आ. खाडे हे भाजपचे जिल्ह्यातील पहिले आमदार. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिरजेतून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासह, मिरजेतून दोन वेळा मताधिक्याने विजय मिळविणारे आ. खाडे नवीन सरकारमध्ये पालकमंत्री होणार असल्याच्या घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांतून झाल्या होत्या. आ. खाडे यांनी मंत्रीपदासाठी जोर लावल्याने भाजप सरकार स्थापनेनंतर त्यांचे मंत्रिमंडळात स्थान निश्चित होते. मात्र कोठेतरी माशी शिंकली व त्यांना पुढीलवेळी मंत्रीपदी वर्णी लावण्याचे आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे चार आमदार निवडून आले. चौघांनीही पक्षनेतृत्वाकडे मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर त्यापैकी खाडे व शिवाजीराव नाईक यांनाच वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाला. मात्र मंत्रिमंडळात दोघांचीही वर्णी लावण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. जिल्ह्यात मंत्रिपदी कोणाची निवड व्हावी, यासाठी भाजपअंतर्गत जोरदार राजकारण सुरू असून विरोधी गटाच्या मंत्रिपदाचा पत्ता कापण्याच्या प्रयत्नापर्यंत या गटांची मजल गेल्याची चर्चा आहे. रखडलेली भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आ. खाडे व आ. नाईक यांची निवड निश्चित असल्याने, त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारातही दोघांना हुलकावणी मिळाली आहे. भाजपअंतर्गत वादामुळेच जिल्ह्याचा मंत्रिमंडळात समावेश होत नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. खाडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने भाजपमध्ये जुन्या-नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा एकदा निराशा झाल्याने खाडे समर्थक संतप्त आहेत. भाजपच्या जिल्ह्यातील काही नेत्यांनी नाईक यांच्या नावासाठी आग्रह धरून खाडे यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याने, त्यांचे समर्थक पक्षातील विरोधकांबद्दल आक्रमक झाले आहेत. मंत्रिपदाच्या हुलकावणीमुळे भाजपमध्ये दोन गटातील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. पक्षांतर्गत विरोध कितीही झाला तरी, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान निश्चित असल्याचे सांगत खाडे समर्थकांची समजूत काढण्यात येत आहे.पक्षाने मला न मागता भरपूर दिले आहे. मात्र जनतेची व कार्यकर्त्यांची मंत्रिपदाची मागणी आहे. वरिष्ठ नेत्यांनी आश्वासन दिले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात माझा समावेश का झाला नाही, याचे कारण माहीत नाही. माझ्याविरोधात कारवाया केल्याचा मी कोणावर आरोप करणार नाही. मात्र मला मंत्रीपद द्यायचे की नाही, याचा पक्षनेतेचे निर्णय घेतील.- सुरेश खाडे, आमदार, मिरज संजय पाटील यांची संदिग्ध भूमिकाखा. संजय पाटील यांनी आ. खाडे यांच्या मंत्रिपदाबाबत संदिग्ध भूमिका घेतल्याचा खाडे समर्थकांचा आरोप आहे, तर मिरजेतील काही जुने भाजप नेते, खाडे यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी झारीतील शुक्राचार्याची भूमिका बजावत असल्याच्या संशयाने भाजप समर्थकांनी संबंधित नेत्याच्या घरात जाऊन गोंधळ घातल्याची चर्चा होती. खाडे यांनी पक्षात पद मिळवून दिलेले नेतेच त्यांच्याविरोधात कारवाया करीत असल्याचा समर्थकांचा आक्षेप आहे.