शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कासेगाव खून प्रकरणातील संशयित जेरबंद

By admin | Updated: November 5, 2014 23:30 IST

ग्रामस्थांत समाधान : वाटमारी, चोरीमधील युवकही पोलिसांच्या जाळ्यात

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे गेल्या आठवड्यात झालेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले. तसेच वाटमारी व चोरी प्रकरणातील गावातील युवकांनाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. चोरी, वाटमारी करणाऱ्या या युवकांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.कासेगाव येथे गेल्या आठवड्यात अनैतिक संबंधातून एका महिलेचा खून झाला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. कासे गाव पोलिसांनीही यावेळी गतीने तपास करुन काही तासातच यातील संशयित आरोपीला अटक केली होती. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच वाटमारी व चोरीप्रकरणी गावातील तीन युवकांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्यानंतर या गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणीही तपास सुरु असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.कासेगाव व परिसरात गेल्या वर्षभरात वाटमारी, मोटारसायकल चोरी, साखळी चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे घडलेले आहेत. त्याचप्रमाणे येथील एका बँकेच्या काही अज्ञातानी पिग्मी एजंटालाही रात्रीच्यावेळी मारहाण करुन त्याच्याकडील ४० हजार रुपये लांबविले होते. या सर्व प्रकरणात या संशयितांचा सहभाग आहे का, याबाबतही चर्चा सुरु आहे.कासेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार मोरे यांनी याप्रश्नी सखोल चौकशी करुन संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)दिशाभूल करण्याचा प्रयत्नखून प्रकरणातील आरोपी जगन्नाथ शिद हा खून केल्यानंतर त्या महिलेच्या घरी पहाटे ५ वाजेपर्यंत होता. यावेळी त्याने स्वत: महिलेच्या नातेवाईकांना दूरध्वनी करुन खुनाचा प्रकार सांगितला होता. या महिलेच्या अंत्यविधीसाठीही त्याचाच पुढाकार होता. शेवटचे पाणीही त्यानेच पाजले. यामुळे प्राथमिक टप्प्यात त्याच्यावर संशय गेला नाही. परंतु पोलिसांनी शिताफीने तपास करीत खरा गुन्हेगार जेरबंद केला.