शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रॉकेल, धान्य कोट्यासाठी शिराळ्यात मोचा

By admin | Updated: February 4, 2015 00:03 IST

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन : केशरी शिधापत्रिका धारकांच्या मागण्या पूर्ण कर्रा

शिराळा : केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य कोटा त्वरित सुरू करावा व रॉकेल कोटा पूर्ववत सुरू करण्याची मागणी घेऊन तालुका राष्ट्रवादी, युवक राष्ट्रवादी व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तिन्ही संघटनांचे अनुक्रमे विजयराव नलवडे, सम्राटसिंंह नाईक व सागर नलवडे यांनी याचे नेतृत्व केले. माजी आमदार मानसिंंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा बसस्थानकापासून मोर्चाची सुरुवात झाली. तिन्ही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा मोर्च्यात सहभाग होता. तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे म्हणाले की, केशरी शिधापत्रिका धारकांना आघाडी शासनाच्या काळात धान्य पुरवठा केला जात होता. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रति किलो २ रुपये दराने गहू व ३ रुपयांनी तांदूळ दिला जात होता. राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेना सरकारने या महत्त्वाकांक्षी योजना बंद केल्या आहेत. खेडेगावात स्वयंपाकासाठी चूल व स्टोव्हचा वापर केला जातो. भारनियमनामुळे कंदील, दिवे लावावे लागतात. नवीन सरकारने रॉकेलचा कोटा कमी केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पूर्वीप्रमाणेच रॉकेलचा कोटा द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी विजयसिंंह देशमुख व तहसीलदार विजया जाधव यांना देण्यात आले. निवेदनातील मागण्या शासनापर्यंत कळविल्या जातील, असे आश्वासन प्रांताधिकारी व तहसीलदारांनी पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी ‘विश्वास’चे संचालक भीमराव गायकवाड, विश्वास कदम, माजी सभापती अ‍ॅड. भगतसिंंग नाईक, संचालक रणजितसिंंह नाईक, अभिजित नाईक, विराज नाईक, विश्वप्रताप नाईक, पंचायत समिती सदस्य लालासाहेब तांबीट, सरपंच गजानन सोनटे, उपसरपंच संभाजी गायकवाड, माजी सरपंच देवेंद्र पाटील, दिलीप घाटगे, ग्रामपंचायत सदस्य एम. आर. कुरणे, दस्तगीर आत्तार, संजय हिरवडेकर, बाबा कदम, सुनील कवठेकर, अशोक यादव, संतोष पांगे, मंगेश कांबळे, बसवेश्वर शेटे उपस्थित होते. (वार्ताहर)