शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

केंपवाड कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरावर मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:27 IST

लिंगनूर : मिरज पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, संतोषवाडी, जानराववाडी या परिसरात केंपवाड येथील साखर कारखान्याच्या राखेमुळे दोन हजार ...

लिंगनूर : मिरज पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, संतोषवाडी, जानराववाडी या परिसरात केंपवाड येथील साखर कारखान्याच्या राखेमुळे दोन हजार एकरवरील शेतीला फटका बसत आहे. कारखान्याने प्रदूषण नियंत्रण व्यवस्था बसवावी यासाठी अध्यक्ष श्रीमंत पाटील यांच्या बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा लिंगनूर येथील बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

परिसरात केंपवाड कारखान्याच्या चिमणीतून निघणाऱ्या राख व धुळीच्या कणांमुळे होणाऱ्या नुकसानप्रश्नी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खराडे म्हणाले की, केंपवाड कारखान्याची निर्मिती होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली असून, कारखान्याच्या चिमणीतून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडते. द्राक्ष घडावर ही राख पडते. त्यामुळे द्राक्षघड काळे पडतात व काळी पडलेली द्राक्षे कमी दराने विकावी लागतात. राख, भुसा, आणि दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतातील ऊस, कापूस, गहू, हरभरा, मका या पिकांचेही मोठे नुकसान होत आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. कारखाना प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्‍त होत आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. कारखान्यामुळे होणारे प्रदूषण पुढील हंगामापूर्वी नियोजन करून थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष भरत चौगुले, शाखाध्यक्ष नंदू नलवडे, सरपंच मारुती पाटील, उपसरपंच चंद्रकांत नाईक, राजाराम नाईक, दीपक मगदूम, अशोक मगदूम, शिवदास शिंदे ,राजू मगदूम, किरण नागणे उपस्थित होते.

कोट

केंपवाड कारखान्याच्या राखेमुळे द्राक्षबागेवर व घडावर राखेचा काळा थर साचल्यामुळे चांगला माल तयार होऊनही व्यापारी द्राक्षे घेत नसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

- संजय यादवाडे, द्राक्ष बागायतदार, लिंगनूर