शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जत मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवा

By admin | Updated: July 19, 2014 00:12 IST

उमाजी सनमडीकर, पी. एम. पाटील : पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी

जत : जत विधानसभा मतदारसंघातून सलग ३८ वर्षे कॉँग्रेसचे आमदार निवडून गेले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ कॉँग्रेसकडे रहावा, अशी मागणी पक्षाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार उमाजी सनमडीकर, तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील व उपाध्यक्ष विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत मतदारसंघाचे प्रतिनिधी व प्रदेश समन्वयक डॉ. अंबालाल पाटील यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती घेतली आहे. त्यांचा अहवाल ते वरिष्ठांना सादर करणार आहेत. जत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे का कॉँग्रेसकडे असावा, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक उमेदवार असावा अशी मागणी आम्ही पक्षाकडे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील ४९ गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळत नसल्यामुळे त्यांना कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी द्यावे, त्यासंदर्भात राज्य शासन कर्नाटक सरकारशी चर्चा करणार आहे. या योजनेचा प्राथमिक अहवाल शासनाला प्राप्त झाल आहे. त्याला अनुसरून प्रयत्न केले जातील आणि जत तालुक्याचे विभाजन करणारा प्रश्न प्रलंबित आहे. जर विभाजन करता आले नाही, तर पूर्व भागात स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय सुरू करून तेथील जनतेची सोय केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जतचे विरोधी गटनेते परशुराम मोरे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, सुनील चव्हाण, संतोेष भोसले, अ‍ॅड. बाळ निकम, संतोष कोळी, विनय बेळंखी उपस्थित होते. (वार्ताहर)