कवठेमहांकाळ : नगरपंचायतच्या विद्यानगर परिसर ते जुना स्टॅण्ड भुयारी गटारीच्या कामात तीन फूट सिमेंट पाइप घालण्याची गरज आहे. तसा नवीन प्रस्ताव तयार करून तत्काळ काम चालू करावे, या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
विद्यानगर येथील पोतदार मळा ते जुने स्टॅण्ड भुयारी गटार योजनेतील एक फूट पाइपऐवजी तीन फूट सिमेंट पाइप टाकून भविष्यात होणाऱ्या अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून नगरपंचायतीने लवकर काम सुरू करावे, अशी मागणी कोळी यांनी केली आहे.
संजय कोळी यांच्या उपोषणास अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रा. दादासाहेब ढेरे, नगरसेवक रुस्तुम शेकड, महावीर माने, राहुल गावडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे, उमेश घाडगे, रणजित घाडगे, विजय गावडे, प्रा. अमोल वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश पाटील, अल्लाबक्ष मुल्ला, शिवसेनेचे अनिल पाटील, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष स्नेहा जाधव, आरपीआयचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ पिंटू माने, बसपाचे नेते शंकर माने, अजिंक्य जाधव, रमजान मुल्ला, विशाल रसाळ, दयानंद सगरे, प्राचार्य डॉ ए.के. भोसले, व्यापारी असोसिएशनचे वैभव गंभीर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग तेली, सुधाकर भोसले यांनी पाठिंबा दिला आहे.